Nanded, Parbhani, Hingoli Light rain in 123 circles
Nanded, Parbhani, Hingoli Light rain in 123 circles 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२३ मंडळांत हलका पाऊस

टीम अॅग्रोवन

नांदेड : दोन-तीन दिवसांच्या उघडीपीनंतर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२३ मंडळांमध्ये गुरुवारी (ता.२७) सकाळपर्यंत २४ तासांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. 

गेली दोन, तीन दिवस पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आंतरमशागत, फवारणी, मूग काढणीच्या कामांनी  वेग घेतला होता. परंतु, बुधवारी (ता.२६) परत अनेक मंडळांत पाऊस झाल्यामुळे शेती कामे खोळंबली. नांदेड जिल्ह्यातील ६८ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड, लोहा तालुक्यातील मंडळामध्ये चांगला पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील ३२ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, पूर्णा तालुक्यात पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील २३ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मि.मी)

नांदेड जिल्हा ः विष्णुपुरी १५.५, लिंबगाव ११.५, लोहा १७.५, माळाकोळी १०.५, कापसी १७.५, सोनखेड २४.५,  शेवडी १७.५, कलंबर १७.५. परभणी जिल्हा ः परभणी २१, परभणी ग्रामीण १६.६, झरी १६.६, पिंगळी ६४.८, पालम १२.८, पूर्णा २५, ताडकळस १५.६, लिमला १५.६, कात्नेश्वर २१.८. हिंगोली जिल्हा ः हिंगोली ७, हयातनगर ३४.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Sludge : शेतकऱ्यांने स्वखर्चाने काढला नदीपात्रातील गाळ

Manoj Jarange Patil : बीडच्या दुष्काळ स्थितीचा मनोज जरांगे यांच्या सभेला फटका

Pre Monsoon Rain : वळवाच्या पावसाची अनेक ठिकाणी हजेरी

Omraje Nimbalkar : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तिन तेरा; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ओमराजे निंबाळकर यांची मागणी

Agrotourism Income : कृषी पर्यटनातून साधावी उत्पन्न वाढीची संधी

SCROLL FOR NEXT