नांदेड, परभणी, हिंगोलीत मृगाची दमदार सुरवात
नांदेड, परभणी, हिंगोलीत मृगाची दमदार सुरवात 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोलीत मृगाची दमदार सुरवात

टीम अॅग्रोवन

नांदेड ः यंदा मृग नक्षत्राची सुरवात दमदार पावसाने झाल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ८) दुपारी एकपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. नांदेड जिल्ह्यातील तामसा (ता. हदगाव) येथे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव (८४ मिमी), तामसा (११२ मिमी), धर्माबाद (८६ मिमी), बिलोली (८० मिमी), लोहगांव (७० मिमी) या पाच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. यंदा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दमदार पावसाला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी वेळेवर होण्याची शक्यता दिसू लागल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बी-बियाणे, खते आदी निविष्ठा खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे.

नांदेड जिल्ह्यामधील ७४ मंडलांमध्ये पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव, मुखेड, लोहा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. माहूर, किनवट तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. परभणी जिल्ह्यातील १६ मंडलांमध्ये पाऊस झाला. पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अन्य तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २३ मंडलांमध्ये पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, वसमत, हिंगोली तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये) ः नांदेड शहर ४०, नांदेड ग्रामीण २६, वजीराबाद ४२, वसरणी ४१, तरोडा २५, तुप्पा ४०, लिंबगाव ३७, विष्णुपुरी ५७, अर्धापूर २२, मालेगाव ३१, दाभड २१, हदगाव ८४, तामसा ११२, हिमायतनगर ३१, मोघाळी ३१, धर्माबाद ८६, करखेली ३४, जारिकोट २८, नायगाव २७, नरसी ३२, मांजरम ३२, कुंटूर २९, बरबडा २४, येवती १८, चांडोला १५, मुक्रमाबाद ३५, बारड ३८, उमरी २७, सिंदी ३९, गोलेगाव २५, , बिलोली ८०, लोहगाव ७०, कुंडलवाडी २५, सगरोळी १८, आदमापूर ३०, देगलूर १७, खानापूर १७, शहापूर ४५, मालेगाव १५, लोहा ३१, मालकोळी ४०, कलंबर ५०, शेवडी ३१, सोनखेड ३३, कापसी ३०, परभणी जिल्हा ः पूर्णा १४, चुडावा २७, पालम १९,चाटोरी १७, बनवस २०, गंगाखेड ३९, माखणी ३०. हिंगोली जिल्हा ः कळमनुरी १६, नांदापूर ४८, आखाडा बाळापूर ४१, डोंगरकडा २५, वारंगा फाटा २२, गिरगांव ३७, कुरुंदा ४०, टेंभुर्णी १९, आंबा ४३, हयातनगर १८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT