नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख हेक्टरवर हरभरा
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख हेक्टरवर हरभरा 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख हेक्टरवर हरभरा

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये २ लाख ३८ हजार ७८ हेक्टरवर (४२.१७ टक्के) पेरणी झाली आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक म्हणजेच १ लाख ३२ हजार ४०९ हेक्टर पेरणी झाली आहे. अन्य पिकांमध्ये ज्वारी ७३ हजार ५५० हेक्टर, गहू २७ हजार १५० हेक्टर, करडई १ हजार ५५४ हेक्टर पेरणी झाली आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ६४ हजार ४६६ हेक्टर एवढे आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत २ लाख ३८ हजार ७८ हेक्टवर पेरणी झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर असून नोव्हेंबर अखेरपर्यंत ९७ हजार १६८ हेक्टवर पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारी १२ हजार ९३१ हेक्टर (४७.९४ टक्के), गहू ११ हजार ८७६ हेक्टर (३०.८२ टक्के), हरभरा ६९ हजार ७८२ हेक्टर (१११.९० टक्के), करडई ४५४ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. ज्वारी, गहू, करडईचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

कृषी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यातील रब्बीच्या सर्वसाधारण क्षेत्रात सुधारणा करत ३ लाख १ हजार ४६४ हेक्टर एवढे गृहीत धरण्यात आले आहे. सोमवार (ता. ३) पर्यंत जिल्ह्यात एकूण ९७ हजार ४९७ हेक्टवर म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्राच्या ३२.३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारी ५३ हजार ६३८ हेक्टवर, गहू ७ हजार ७० हेक्टरवर, हरभरा ३५ हजार ३२८ हेक्टवर, करडईची १ हजार ७० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे १ लाख २६ हजार २९० हेक्टर क्षेत्र असून ४३ हजार ४१३ हेक्टवर पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रामध्ये ज्वारी ६ हजार ९३६ हेक्टर, गहू ८ हजार २०४ हेक्टर, हरभरा २७ गजार २९९ हेक्टवर, करडई ३० हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT