नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २९ तालुक्यांत कमी पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २९ तालुक्यांत कमी पाऊस 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २९ तालुक्यांत कमी पाऊस

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २९ तालुक्यांमध्ये आजवर अपेक्षित पावसाच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. केवळ नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या तीनही जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यात आजवर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाऊस झाल्यामुळे पीक परिस्थिती चांगली दिसत आहे. अत्यंत कमी पाऊस झालेल्या मंडळातील पाणीटंचाईची समस्या कायम आहे.

गवताची वाढ न झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. नद्या, नाले, ओढे प्रवाहित न झाल्यामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. उशिरा पेरणी झालेल्या भागातील पिकांची वाढ खुंटली आहे.

नांदेड जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी ९५५.५५ मिलिमीटर, तर बुधवार (ता. १४) पर्यंतच्या अपेक्षित पावसाची सरासरी ५५०.२४ मिलिमीटर आहे. ४६४.८० मिलिमीटर म्हणजेच अपेक्षित पावसाच्या सरासरीच्या ८४.२१ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या ४८.५४ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील १६ पैकी केवळ मुदखेड तालुक्यात आजवर अपेक्षित पावसाच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर देगलूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.

नांदेड तालुक्यात ४३३.११ मिमी (८३.७७ टक्के), मुदखेडमध्ये ५१९.६८ (१०३.४० टक्के), अर्धापूरमध्ये ४०५.३०(८२.६६ टक्के), भोकरमध्ये४८२.९५ मिमी (९०.११ टक्के), उमरीत ४६३.७८ मिमी (८६.६३ टक्के), लोहा ३७२ मिमी (७६.३१ टक्के), किनवट ६४३.५३ (९४.५४ टक्के), माहूर ६२९.८४ (९२.५३ टक्के), हदगाव ४४७.१४ (७४.३० टक्के), हिमायतनगर ५२२.०२ (८६.७४ टक्के), देगलूर २९९.६६ (५८.४५ टक्के), बिलोली ५०५.४० (८७.५९ टक्के), धर्माबाद ४५४.३१ (८०.९९ टक्के), नायगाव ४४०.८०(७८.५८ टक्के), मुखेड ३९८.४२ (८१.२६ टक्के) पाऊस झाला.

परभणीत वार्षिक सरासरी ७७४.६२ मिमी, तर बुधवारपर्यंत ४२९.३५ मिलिमीटर सरासरी आहे. यंदा अपेक्षित पावसाच्या सरासरीच्या ६४.२ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या ३५.६ टक्के पाऊस झाला. अन्य तालुक्यामध्ये जिंतूर २७६.१७ (५८.४ टक्के), सेलू २३४.६० (५२.७ टक्के),  मानवत ३१७.६८ मिमी (७१.३ टक्के), पाथरी २४५.३२ (५८ टक्के), सोनपेठ २६८ (६९.८टक्के), गंगाखेड २८०.२५ (७३ टक्के), पालम २५१.६५ (६५.६ टक्के) मिमी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात ३८०.४४ मिमी म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या ७२.२१ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या ४२.६१ टक्के पाऊस झाला. पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. वसमत तालुक्यात सर्वात कमी ४५.४९ टक्के, तर औंढा नागनाथ तालुक्यात ९०.६८ टक्के पाऊस झाला. हिंगोली तालुक्यात ४६५.४३ (६८.७५ टक्के), कळमनुरी ४८७.५० (८८.१३ टक्के), वसमत ४४२.२९ (४५.४९ टक्के), औंढा नागनाथ ४४३ (९०.६८ टक्के), सेनगाव ४१३ (७१.७९ टक्के) मिमी पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT