Nanded district crop insurance server down on last day
Nanded district crop insurance server down on last day 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्या अखेरच्या दिवशी पिकविम्याचा सर्व्हर डाऊन

टीम अॅग्रोवन

नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत पीक विमा प्रस्ताव सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.३१) महा ई सेवा (जनसुविधा केंद्र) केंद्रांवर सर्व्हर डाऊनची समस्या कायम होती. त्यामुळे शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागले. अनेक बॅंकांनी ऑफलाइन पीकविमा प्रस्ताव स्विकारण्यास असहकार्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली. शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊन जनसुविधा चालकांकड़ून शेतकऱ्यांची लूट सुरु असल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी  ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९ लाख १० हजार, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ६ लाख २१ हजारांवर, हिंगोली जिल्ह्यात २ लाख ५४ हजारांवर पीकविमा प्रस्ताव सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यंदा कोरोनाच्या साथीमुळे पीकविमा प्रस्तावासाठी अखेरच्या दिवशी होणारी गर्दी अनेक ठिकाणी दिसली नाही. गेल्या आठवडभरापासून सर्व्हर डाऊनणे, ग्रामीण भागातील जनसुविधा केंद्रांवर नेटवर्क नसणे, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवरील फार्मर कॉर्नरव्दारे थेट विमा प्रस्ताव दाखल करता न येणे, आदी कारणांमुळे शेतकऱ्यांची हेळसांड झाली. 

जनसुविधा केंद्रांच्या संख्येत वाढ झाली.  तरीही अखेरच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी बॅंकांनी विमा प्रस्ताव स्विकारण्याचे आदेश जिल्हाप्रशासनातर्फे देण्यात आले होते. परंतु, अनेक बॅंकांची नकार घंटा कायम असल्याने शेतकऱ्यांना जनसुविधा केंद्रांवर जाऊन विमा प्रस्ताव दाखल करण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेरच्या दिवशी सर्व्हरवर लोड आल्यामुळे खूप वेळ लागत  होता. 

मुदत वाढविण्याची मागणी

अनेक केंद्र चालकांनी शेतकऱ्यांचे प्रस्ताव एकत्रित घेतले. रात्री उशीरा ते ऑनलाइन भरल्यानंतर पावती दिली जाईल, असे सांगितले. परंतु, प्रत्येक प्रस्तावांसाठी २०० ते ३०० रूपये घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विविध कारणांनी पीकविमा योजनेतील सहभागापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT