छाननीपूर्वीच नावे गायब
छाननीपूर्वीच नावे गायब 
मुख्य बातम्या

छाननीपूर्वीच नावे गायब

Chandrakant Jadhav

जळगाव : कर्जमाफीसंबंधीच्या अर्जांबाबतचे वाचन करताना ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले, त्यांचीही नावे गायब झाली असल्याचे दिसून आले आहे. अनेक गावांतील मोठ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या किंवा गावांमध्ये चावडीवाचनानंतर असेच चित्र असल्याची स्थिती आहे. अद्याप छाननी झालेली नाही, त्यापूर्वी अर्ज दाखल करूनही यादीत नावे कशी आली नाहीत, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना आता पडला आहे. हा गोंधळ दूर करून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली जावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ज्या कर्जमाफीस पात्र थकबाकीदार किंवा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केलेला नाही, त्यांनाही या योजनेतून लाभ मिळेल; परंतु केवळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासदांनाच हा लाभ मिळू शकेल. अर्थातच सोसायटीच्या पात्र थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सचिवांनीदेखील १ ते ६६ या नमुन्यांतर्गत शासनाला सादर केली आहे.

अनेक सोसायट्यांची ही माहिती तयार झाली असून, ती तालुका स्तरावर सहनिबंधक कार्यालयात सादर करण्यात आली आहे. सोसायट्या किंवा बॅंकांची माहिती व ऑनलाइन अर्ज यांची पडताळणी केल्यानंतर कर्जमाफीसंबंधीचा लाभ देण्यास सुरवात होईल. या प्रक्रियेला आणखी ८ ते १० दिवस सहज लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सहायक निबंधकांकडे तक्रारी चावडीवाचनात ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली नाहीत, त्यांनी मंगळवारी सहायक निबंधक कार्यालयात तक्रारी केल्या. यानुसार सहनिबंधक यांनी माहिती घेऊन कार्यवाही सुरू केली. या तक्रारी वाढतच असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात शताब्दी वर्ष पूर्ण केलेल्या भादली (जि. जळगाव) विविध कार्यकारी सोसायटीमध्ये जवळपास ८०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते; पण केवळ ६१२ अर्जदारांची नावे यादीत आली, अशी माहिती या सोसायटीचे चेअरमन प्रकाश आनंदाशेठ नारखेडे यांनी दिली.

अशीच स्थिती गणपूर (ता. चोपडा) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतही आहे. तेथे २०० शेतकऱ्यांची नावे यादीतून गायब झाली. याबाबत सुकाणू समितीचे एस. बी. पाटील (ता. चोपडा) यांनी लागलीच सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार केली. तेथून दुरुस्ती करून घेऊ, असे उत्तर मिळाल्याचे पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT