संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नागपूर जिल्हा परिषद देणार अनुदानावर फेरोमोन ट्रॅप

टीम अॅग्रोवन

नागपूर   ः बोंडअळीच्या प्रादुर्भावविषयक निरीक्षण घेता यावे याकरिता शेतकऱ्यांना या हंगामात फेरोमोन ट्रॅप अनुदानावर देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समितीकडून घेण्यात आला. ५० टक्‍के अनुदानावर शेतकऱ्यांना हे ट्रॅप दिले जाणार आहेत.

जिल्ह्यात २ लाख १२ हजार ४३४ हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी, या वर्षी लागवड क्षेत्रात घट होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु या वर्षी कापसाखालील क्षेत्रात वाढच झाली.

लागवड झालेल्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून फेरोमोन ट्रॅपचा पुरवठा अनुदानावर केला जाणार आहे. कृषी समितीच्या सदस्यांनी या संदर्भातील मागणी बैठकीत लावून धरली होती. त्यानुसार अनुदानावर ट्रॅप पुरवठ्याचा ठराव घेण्यात आला. बैठकीला विनोद पाटील, कमलाकर मेंघर, मनोज तितरमारे, पद्माकर कडू, रामदास मरकाम उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT