नागपूर ४४.१ अंशांवर; आजपासून वादळी पावसाची शक्यता
नागपूर ४४.१ अंशांवर; आजपासून वादळी पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

नागपूर ४४.१ अंशांवर; आजपासून वादळी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे  : विदर्भात सूर्य चांगलाच तळपत असल्याने नागपूर येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील हे देशाचे सर्वोच्च तापमानही ठरले आहे. यातच पूर्वमासमी पावसाला पोषक हवामान असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आजपासून (ता. ११) वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान थोडेसे कमी झाले असले, तरी विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका कायम आहे. अकोला आणि चंद्रपूरनंतर नागपूर येथेही तापमानात मोठी वाढ झाली आहे. नागपूरात उष्णतेची लाट आली असून, पारा हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या पुढे असून, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे आहे. तर जळगाव, मालेगाव, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी येथेही ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.  दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कोमोरीनपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खडित झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्ट्याचा विस्तार काहीसा कमी झाला आहे. बुधवारी दुपारी पूर्व विदर्भात ढगाळ हवामान होते. आजपासून (ता. ११) विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, मराठवाड्यातील बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर या जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

बुधवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.१ (०.८), जळगाव ४२.५ (१.९), कोल्हापूर ३७.६ (०.५), महाबळेश्वर ३२.९ (१.२), मालेगाव ४२.२ (३.०), नाशिक ३६.९ (-०.४), सांगली ३८.९ (०.७), सातारा ३८.६ (२.१), सोलापूर ४२.० (२.५), डहाणू ३३.३ (०.९), सांताक्रूझ ३३.५ (०.३), रत्नागिरी ३२.६ (०.५), औरंगाबाद ३९.८ (१.९), बीड ४२.० (३.३), नांदेड ४२.५ (२.५), परभणी ४२.९ (३.१), अकोला ४३.१ (३.१), अमरावती ४२.४ (२.१), बह्मपुरी ४३.० (३.६), चंद्रपूर ४२.४ (२.०), गोंदिया ४१.० (१.८), नागपूर ४४.१ (४.६), वाशीम ४१.८, वर्धा ४३.२ (३.१), यवतमाळ ४२.० (२.६). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT