मुंबईत 'रेड अलर्ट', पावसाची धुवांधार बॅटिंग
मुंबईत 'रेड अलर्ट', पावसाची धुवांधार बॅटिंग 
मुख्य बातम्या

मुंबईत 'रेड अलर्ट', पावसाची धुवांधार बॅटिंग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : रात्री पासूनच पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईत 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये पावसाची मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे तर रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीला ही यामुळे फटका बसला आहे.

पावसामुळे मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली. कुर्ला,किंग सर्कल,सायन गांधी मार्केट मध्ये पाणी साचले. गोरेगाव, दहिसर, जोगेश्वरी मध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले. दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाचे केले आहे. मुसळधार पावसामुळे मुलुंडमधील विद्युत सेवा खंडित झाला आहे.मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे अनेक स्टेशन जलमय झाले आहेत. सीएसएमटी कर्जत-कसारा-खोपोली सेवा ठप्प झाली आहे.पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पंधरा मिनिटे उशिराने सुरू सायन कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी सचल्याने आहे.नालासोपारा, बदलापूर,अंबरनाथ स्टेशनवर देखील ट्रॅकवर पाणी साचले आहे. ठाणे-कल्याण स्थानकावर ट्रॅक वरती पाणी साचले आहे.हार्बर लाईनवर चुनाभट्टी स्थानकादरम्यान ट्रॅक वरती पाणी साचल्याने हार्बर सेवा देखील थॉप झाली आहे.हमामान विभागाने येत्या 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.मुंबई उपनगर,ठाणे कल्याण,नवी मुंबईत ही पावसाने जोरदार बॅटिंग केली.दक्षिण मुंबईत देखील पाऊस जोरदार कोसळतोय. यामुळे अंधेरी,खार,मालाड सबवे मध्ये पाणी साचले आहे.जेव्हीएलआर, वेस्टर्न एक्सप्रेस आणि एलबीएस मार्गावर ही पाणीच पाणी बघायला मिळतंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT