vashi apmc
vashi apmc 
मुख्य बातम्या

मुंबई बाजार समिती सुरू, पुणे कधी?

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतकऱ्यांना बाजार व्यवस्थेचा पर्याय न देताच बाजार समित्या बंद केल्यानंतर भाजीपाला, फळांचे अतोनात नुकसान होत आहे. अशातच आशिया खंडातील सर्वांत मोठी असलेल्या मुंबई बाजार समिती आज (ता.१५) पासून सुरू होत असताना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची पुणे बाजार समिती कधी सुरू होणार हा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे.  पुण्यात आजपासून भुसार विभाग  सुरू होत असला, तरी फळे-भाजीपाला बाजार सुरू होण्याची शेतकऱ्यांना अधिक प्रतीक्षा आहे.   पुणे बाजार समिती सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी पोलीस, महसूल आणि बाजार समिती प्रशासनाने समन्वयाने काम करत असून, फळे भाजीपाल्यासाठी टप्प्याटप्प्याने उपबाजार सुरू करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र, हे उपबाजार आवार आणि मुख्य बाजार समिती कधी सुरू करणार याबाबत स्पष्ट न करण्यात आल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. मुंबईत आजपासून भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग सुरू करण्यात येत आहेत. कोरोना लॉकडाऊनमध्ये पुणे शहरातील काही हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले. यामध्ये बाजार समितीचे आवार असलेल्या गुलटेकडी परिसरातील झोपडपट्टीचा समावेश होता. या भागामध्ये दोन जण कोरोना बाधित आढळल्याने, शेतमाल खरेदी विक्रीचा कोणताही पर्याय न देता बाजार समिती बंदचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे शहरातील भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळीत होऊन कृत्रिम भाववाढ होण्यास सुरुवात झाली होती. तर पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याची तक्रार पूना मर्चंटस चेंबर ने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे केली होती.  मर्चंटस् चेंबरच्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी, शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशासन, बाजार समिती प्रशासनासोबत बैठक समन्वय बैठक घेत मार्ग काढला. यानंतर मर्चंटस् चेंबर ने भुसार विभाग सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत बुधवार (ता.१५) पासून व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष पोपट ओस्तवाल यांनी जाहीर केले.  भुसार विभागानंतर फळे भाजीपाला विभाग सुरू करण्याबाबत बाजार समिती प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले,‘‘पोलीस, महसूल प्रशासनाच्या समन्वयातून भुसार विभाग सुरू करण्यास मर्चंटस् र्चंटस्‌ चेंबरने सकारात्मक भूमिका घेतली आहे. यानंतर आता फळे भाजीपाला विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल असून, त्या अगोदर मांजरी, उत्तमनगर, मोशी आणि खडकी हे उपबाजार सुरू करत आहोत. आज (ता.१५) रात्रीपासून मोशी उपबाजारात आवक सुरू होण्यासाठी मंगळवारी (ता.१४) व्यापारी अडत्यांची बैठक घेतली आहे. नंतर मांजरी येथील बैठक घेऊन गुरुवार (ता.१६) येथील बाजार सुरू होईल.’’ अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले,‘‘ सध्याचा बाजार आवार हा अडते असोसिएशनने नाही तर प्रशासनाने बंद केला होता. आपत्कालीन सेवेत भाजीपाल्याचा समावेश असल्याने शासन निर्णयानुसार आम्ही काम करू.’’ शहरातील मोठ्या मैदानांवर बाजार विचाराधीन  गुलटेकडी हॉटस्पॉट जाहीर केल्याने मुख्य बाजार सुरू करणे अवघड आहे. मात्र शहरांच्या चारही दिशांना असलेल्या शासनाच्या मोठ्या मैदानांवर चक्राकार पद्धतीने घाऊक खरेदीदारांसाठी व्यवस्था करण्याचे विचाराधीन असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितले. यामध्ये हडपसर येथील राज्य राखीव पोलीस दलाचे मैदान, शिवाजीनगर आणि चव्हाणनगर येथील पोलीस मुख्यालयाचे मैदान, कृषी महाविद्यालयाचे मैदान या ठिकाणांचा विचार सुरू आहे. प्रतिक्रिया सध्या आमच्या शेतात २ एकरवरील कारली सुरू होती. २-४ तोड्यानंतर पुणे बाजार समिती बंद झाल्याने कारली आता झाडावरच लाल होऊन पडू लागली आहे. बाजार समिती सुरू झाली पाहिजे अस वाटत, पण कोरोनामुळे धोका आहेच. एखाद्या हंगामात फड गेला, ते सर्व अंगावर सोसावं लागणार आहे. - नितीन शेळके, शेतकरी, दौंड, जि.पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT