राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात एकीकडे ‘स्थगिती’; दुसरीकडे ‘मान्यता’
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात एकीकडे ‘स्थगिती’; दुसरीकडे ‘मान्यता’ 
मुख्य बातम्या

राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात एकीकडे ‘स्थगिती’; दुसरीकडे ‘मान्यता’

टीम अॅग्रोवन

पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहायकांच्या बदल्यांना स्थगिती देणाऱ्या कुलगुरूंनी, दुसरीकडे कृषी सहायकांच्या बदल्यांचे आदेश काढल्याने शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथ आता पुढील ४० दिवसात निवृत्त होणार आहेत. विद्यापीठातील नागरी सेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ.विश्वनाथा यांनी या बदल्या करीत संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करा, असे आदेश दिले आहेत.

“निवृत्त होण्याच्या आधी जबाबदार पदावरील अधिकारी शक्यतो मोठे निर्णय घेण्याचे टाळतात. त्यामुळे नव्या कुलगुरूंसमोर समस्या तयार होतात. राहुरीत मात्र निवृत्तीच्या जवळ पोचलेले कुलगुरू एका बाजूला बदल्या रद्द करतात आणि दुसऱ्या बाजूला बदल्यांचे आदेशही काढतात, हे संशयास्पद आहे,” असे मत एका माजी कुलगुरूंनी व्यक्त केले आहे.

तक्रार निवारण समितीकडे दाद मागू “या बदल्या विनंती स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांच्या अर्जांना कुलगुरूंनी केराची टोपली दाखवली आहे. विद्यापीठातील एका लॉबीने अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या दाबून ठेवल्या आहेत. मात्र, विशिष्ट बदल्यांना मान्यता देत कुलगुरूंनी संशयाचे वातावरण तयार केले आहे. आम्ही विद्यापीठ तक्रार निवारण समितीकडे दाद मागणार आहोत,” अशी माहिती कर्मचाऱ्यांच्या गोटातून देण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT