नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक परवाने
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक परवाने 
मुख्य बातम्या

नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक परवाने

टीम अॅग्रोवन

पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी शेतकरी गट आणि शेतकऱ्यांना परवाना देण्यास गुरूवारी (ता.२६) सुरूवात झाली. शेतकरी संबधित परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून परवाने घेत आहेत. पुणे विभागातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसात तब्बल एक हजार ७० परवाने घेतले आहेत. त्यामुळे शहरातील भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत झाली आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी केल्यामुळे शेतमाल वाहतुक अडचणीचे झाले होते. म्हणून परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२५) झालेल्या बैठकीत अत्यावश्यक सेवा व वस्तु यांची वाहतुक करणाऱ्या मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र देण्याबाबत सविस्तर सुचना देण्यात आलेल्या होत्या. सध्या प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवर अर्ज स्वीकारले जात आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जात नमुद वाहनास तात्काळ प्रमाणपत्र जारी करण्यात येत असून त्याची नोंद स्वतंत्र नोंद वहीत ठेवली जात आहे. तसेच परिवहन कार्यालयाकडून जारी केलेले प्रमाणपत्र अर्ज करणाऱ्या वाहनधारकाच्या ई-मेलवर स्कॅन करून पाठविले जात असल्याने वाहनधारकांना शेतीमालाची वाहतूक करणे सोपे झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीमालाची विक्रीस सुरूवात झाली असल्याचे दिसून येते.

पुणे विभागातील शेतकरी व शेतकरी गट पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड, नगर, सोलापूर अशी विविध विभागाशी संपर्क साधत आहे जिल्हानिहाय परवान्यांची संख्या

जिल्हा परवाने
नगर १२६
पुणे २२१
सोलापूर ७२३
एकूण १०७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT