सोयाबीनसह मूग, उडिदाला अमरवेलीचा विळखा
सोयाबीनसह मूग, उडिदाला अमरवेलीचा विळखा 
मुख्य बातम्या

सोयाबीनसह मूग, उडिदाला अमरवेलीचा विळखा

टीम अॅग्रोवन
अकोला : द्विदल वर्गीय पिकांवर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शेतकरी चिंतातूर बनत आहेत. त्याचा पिकाच्या उत्पादनाला थेट फटका बसण्याची स्थिती बनली आहे. प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडिद, तूर या पिकांवर ही वेली वाढताना दिसून येत आहे.
त्याचा प्रसार सरसकट रोखणे जिकिरीचे बनले आहे. अमरवेलीची वाढ प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद या पिकांवर अधिक होताना दिसून येत आहे. सध्या ही पिके शेंगाच्या अवस्थेत असून या वेलीचा विळखा वाढतच असल्याने अनेक शेतांमध्ये पीक या वेलीने गुंडाळलेले पहायला मिळते आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतीतील कामे पुन्हा सुरू झाली आहेत. सोयाबीनचे क्षेत्र या भागात अधिक असून शेतकऱ्यांनी तणनाशकाद्वारे तण व्यवस्थापन केले आहे. परंतु, अमरवेलीचा यामुळे बंदोबस्त झालेला नाही. शेंगा परिपक्व होत असताना ही वेली फोफावत चालल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. अमरवेली परोपजीवी वनस्पती सोयाबीन, मूग, उडिद या पिकावर अमरवेलीचा प्रादुभार्व विदर्भात अधिक दिसून येत आहे. हे तण परोपजीवी समजले जाते. जगण्यासाठी योग्य अशा झाडावर ते अवलंबून राहते. ते ठरावीक वनस्पती, कुंपण, झाडांवर वाढते. ही वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतींच्या खोड तसेच पानांवर पसरते.  दुसऱ्या झाडातील अन्नद्रव्ये शोषून घेते. यामुळे झाडाची वाढ खुंटते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT