green moong
green moong  
मुख्य बातम्या

मूग खरेदी एक ऑक्टोबरपासून

टीम अॅग्रोवन

मुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे ३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून राज्यात १ ऑक्टोबर २०२० पासून मूग खरेदीला सुरुवात होणार असून ही खरेदी प्रक्रिया पुढे ९० दिवस चालणार आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. १५ सप्टेंबरपासून मूग खरेदीसाठीची नोंदणी सुरु झाली आहे. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे-२९, मार्केटिंग फेडरेशन-१०५, महाएफपीसी-४७ खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत २३० शेतकऱ्यांनी मुगाची नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहनही पणन मंत्री श्री. पाटील यांनी केले. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे, त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. हंगाम २०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मुगाला ७ हजार १९६ असा हमीभाव जाहीर केला आहे. सर्व मूग खरेदी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT