मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू
मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू 
मुख्य बातम्या

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू...

sandeep navale

पुणे : राजस्थानच्या पश्चिम भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस थांबल्यामुळे बुधवार (ता. २७) पासून मॉन्सूनने पंजाब, हरियाना व कच्छ आणि पश्चिम राजस्थानच्या बहुतांशी भागातून परतण्यास सुरवात केल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राजस्थानच्या पश्चिम भागातून गुरुवारी (ता. २८) परतण्याचा अंदाज हवामान विभागाने रविवारी (ता. २४) दिला होता; परंतु अंदाजाच्या एक दिवस आधीच मॉन्सून परतण्यास सुरवात झाली आहे.  सध्या राजस्थानच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असून, कमाल तापमानात घट होण्यास सुरवात झाली आहे. देशात साधारणपणे एक सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास होण्याचा अंदाज असतो. गेल्या आठ दिवसांपूर्वी देशाच्या वायव्ये भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. काही ठिकाणी हलका स्वरूपाच्या सरीही बरसत होत्या; परंतु मागील पाच ते सहा दिवसांपासून पाऊस उघडल्याने परतीच्या पावसास सुरवात झाली आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, उत्तराखंड, गुजरात, झारखंड या भागातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे परतीच्या पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे.  परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहू लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना या भागात पाऊस थांबला असून, उत्तरेकडील हवेचा दाब वाढलेले आहे. दक्षिणेकडील हवेचे दाब कमी होण्यास सुरवात झाली. ईशान्येकडील हवेचा दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येऊ लागले आहे. टप्याटप्याने हे वारे दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. हवामान विभागाचे वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागातही परतीचा चांगला पाऊस पडतो. कोकणात परतीचा पाऊस कमी असतो; परंतु दक्षिणेकडील तमिळनाडूच्या भागात ईशान्येकडील पाऊस नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत सुरू असतो. मॉन्सूनचा दहा वर्षांतील परतीचा प्रवास    ३० सप्टेंबर २००७   २९ सप्टेंबर २००८    २६ सप्टेंबर २००९    २७ सप्टेंबर २०१०    २३  सप्टेंबर २०११   २४ सप्टेंबर २०१२    ९ सप्टेंबर २०१३    २३ सप्टेंबर २०१४   ४ सप्टेंबर २०१५    १५ सप्टेंबर २०१६ यंदा परतीचा पाऊस गुरुवारी सुरू होण्याचा अंदाज होता; परंतु एक दिवस आधी परतीचा पाऊस सुरू झाला आहे. एकंदरीत परतीच्या पावसास थोडा उशीर झाला असला, तरी राज्यात काही ठिकाणी हा पाऊस चांगला होईल.  - ए. के. श्रीवास्तव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे 

राज्यात ऑक्टोबर ‘हीट’ची चाहूल  येत्या रविवार (ता. १) पर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने राज्यात ऑक्टोबर ‘हीट’ची चाहूल लागली आहे. गुरुवारी (ता. २८) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT