मॉन्सून पोचला दक्षिण कर्नाटकात
मॉन्सून पोचला दक्षिण कर्नाटकात 
मुख्य बातम्या

कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या महाराष्ट्र आगमनाची उत्सुकता

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) उत्तरेकडील प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) मॉन्सून केरळचा उर्वरित भाग व्यापून दक्षिण कर्नाटकात दाखल झाला आहे. मॉन्सूनने कर्नाटकातील मंगळूर, म्हैसूरपर्यंत मजल मारली आहे, तर तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत प्रगती आहे. ईशान्य भारतात आणखी वाटचाल करताना त्रिपुरा, अासाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत मॉन्सून पोचल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  सोमवारी (ता. १०) केरळच्या कन्नूरपर्यंत पोचलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनी पुढे वाटचाल केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पुढील वाटचालीस पोषक हवामान तयार होत असल्याने कर्नाटक तमिळनाडूच्या आणखी काही भागांसह मध्य अरबी समुद्रात मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. तर बंगालच्या उपसागरावरूनही मॉन्सून पुढे चाल करणार असून, रविवारपर्यंत (ता. १६) सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   दरम्यान यंदा मॉन्सूनची वाटचाल खूपच अडखळत सुरू आहे. आगमनास प्रतिकूल स्थिती असल्याने यंदा केरळात नियमित वेळेच्या तब्बल आठवडाभर उशिराने मॉन्सून डेरेदाखल झाला. शनिवारी (ता. ८) केरळच्या कोचीसह तमिळनाडूच्या मदुराईपर्यंतची मजल मारली. दोन दिवसांत सोमवारी (ता. १०) किनाऱ्यावर आणखी प्रगती करत कन्नूरपर्यंतचा टप्पा पूर्ण करून, केरळचा बहुतांशी भाग व्यापला होता. मॉन्सून साधारणतः १३ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोचण्याची शक्यता असतानाच अरबी समुद्रात ‘वायू’ वादळाची निर्मिती झाली. चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल प्रभावित झाली. तसेच समुद्रावरील बाष्प ओढून घेतल्याने मॉन्सूनचे राज्यातील आगमनही लांबले आहे. ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे.  ‘वायू’ चक्रीवादळ ओसरायला लागले अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत घोंघावत असलेले वायू चक्रीवादळ ओसरायला लागले आहे. रविवारपर्यंत (ता. १६) वादळाची तीव्रता आणखी कमी होणार आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजता हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून पश्चिमेकडे सरकू लागले आहे. पोरबंदरपासून पश्चिमेकडे १५० किलोमीटर, वेरावळपासून २१० किलोमीटर, तर दीवपासून २७० किलोमीटर पश्चिमेकडे ही प्राणली होती. वादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीलगतच्या भागात ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. आज (ता. १५) गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT