पाऊस
पाऊस  
मुख्य बातम्या

मॉन्सूनची कोकणात जोरदार ‘एन्ट्री’; अनेक भागात पाऊस

टीम अॅग्रोवन

पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर उद्यापासून (ता. २२) सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत असून, वाहन हत्ती असल्याने पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. वादळ निवळल्यानंतरही काही दिवस अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले. मॉन्सूनने १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पूर्ण केली. त्यानंतर किनारपट्टीच्या भागात वेगाने प्रगती करत मॉन्सूनने गुरुवारी संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी, गोवा राज्य व्यापून दक्षिण कोकणातील रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरपर्यंत मजल मारली. पूर्व भारतातील पश्चिम बंगालच्या आणखी काही भागांत प्रगती करत मॉन्सूनने कोलकत्यापर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत समुद्राला उधाण आले असून, जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती आहे. रविवारपर्यंत (ता. २३) कर्नाटक महाराष्ट्राचा आणखी काही भाग, संपूर्ण तमिळनाडू व्यापून आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, बिहार, झारखंड, ओडिशाच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कमी दाबक्षेत्राची निर्मिती उत्तर-मध्य प्रदेश आणि दक्षिण उत्तर प्रदेश परिसरावर असलेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी विरून गेले. तर बंगालच्या उपसागरात ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच पंजाबपासून उपसागरातील कमी दाबापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT