मॉन्सूनने देशाचा उंबरठा अोलांडला; केरळ व्यापला
मॉन्सूनने देशाचा उंबरठा अोलांडला; केरळ व्यापला 
मुख्य बातम्या

मॉन्सूनने देशाचा उंबरठा अोलांडला; केरळ व्यापला

टीम अॅग्रोवन

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (आज) संपूर्ण केरळ व्यापले असून, तर तामिळनाडूच्या काही भागात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारी (ता. २८) प्रगती करत भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कोमोरीन भागात धडक दिली होती. बंगालच्या उपसागरातही संपूर्ण अंदमान बेटसमूहासह मोठा पल्ला पार केला आहे. 

अंदमानात नियमित वेळेच्या सुमारे पाच दिवस उशिराने (२५ जून) दाखल झालेल्या माॅन्सूनने वेगाने प्रगती सुरू ठेवली आहे. रविवारी (ता. २७) अंदमान बेटांच्या बहुतांशी भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली तर दुसऱ्याच दिवशी साेमवारी श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापून केरळच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंतचा टप्पा पुर्ण केला. दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव - कोमोरीन परिसर, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग, पूर्वमध्य, अग्नेय भागामध्ये मॉन्सून दाखल झाला आहे.  अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस चाल मिळाली आहे.

अरबी समुद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर रविवारी निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी ठळक झाले होते. यातील कर्नाटकच्या किनारपट्टीवरील कमी दाब  तर बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वमध्य भागामध्ये सोमवारी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT