पूर्व भारतात माॅन्सूनची चाल
पूर्व भारतात माॅन्सूनची चाल 
मुख्य बातम्या

पूर्व भारतात माॅन्सूनची चाल

टीम अॅग्रोवन

पुणे : प्रवाह मंदावल्याने अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही जवळपास १३ दिवस माॅन्सूनची वाटचाल थांबली होती. शनिवारी अरबी समुद्रातून प्रवास सुरू केल्यानंतर सोमवारी (ता. २५) पूर्व भारतातही मॉन्सूनने चाल केली आहे. पश्‍चिम बंगाल व्यापून, बिहार, झारखंड ओडिशाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. पश्‍चिम भागातील गुजरात, मध्य प्रदेशातील मान्सूनची प्रगती मात्र जैसे थे आहे.  मेडन जुलियन आॅस्सिलेशनची स्थिती अनुकूल नसल्याने मॉन्सूनचे प्रवाह मंदावले होते. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर माॅन्सूनची वाटचाल झाली नव्हती. त्यामुळे राज्यात पावसानेही उघडीप दिली होती. शनिवारपासून राज्यात मॉन्सूनची प्रगती सुरू झाली. रविवारीही मोठी मुसंडी मारत जवळपास संपूर्ण राज्यासह गुजरातच्या निम्मा, भाग मध्य प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला. तर सोमवारी ईशान्य भारतातील सर्व राज्य, सिक्कीम, पश्‍चिम बंगाल व्यापून मॉन्सूनने बिहार, झारखंडमध्ये धडक दिली. ओडिशाच्या आणखी काही भागातही मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधील मॉन्सूनची उत्तर सीमा कायम आहे.  पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने बुधवारपर्यंत (ता. २७) संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगडसह गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहारच्या आणखी काही भागात माॅन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. २६ जुलैपासून वायव्य भारतातील राज्यांमध्ये वादळी पाऊस सुरू होणार असून, १ जुलैपर्यंत मॉन्सून दिल्लीसह वायव्य भारताच्या काही भागात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  पश्‍चिम बंगालमध्ये वीज कोसळून पाच जण ठार कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये सोमवारी (ता.२५) झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यांमुळे वीज कोसळून पाच जण ठार झाले तर एक जण वाहून गेला, अशी माहिती राज्याच्या आपत्ती निवारण अधिकाऱ्याने दिली.पुरुलिआ जिल्ह्यातील भोमरागोरा गावात एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण हे राजेंद्रपुरच्या बसिरहट ब्लॉक दोनमध्ये आणि २४ परगणा जिल्ह्यातील केउतेपारा येथे वीज कोसळल्याने मरण पावले,असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT