राज्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
राज्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

वृत्तसेवा

पुणे : विदर्भाच्या अाग्नेय भागासह लगतच्या भागावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आता नैर्ऋत्य मध्य प्रदेश व लगतच्या भागावर आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १९० मिलिमीटर पावसाची नाेंद घाटमाथ्यावर धारावी येथे झाली. गुरुवार (ता. २४) पर्यंत काेकण गाेव्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुढील चार दिवसांत येत्या शुक्रवारी (ता. २५) दक्षिण काेकणासह गाेव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.   साेमवार (ता. २१) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत झालेला पाऊस मिलिमीटर मध्ये पुढीलप्रमाणे

काेकण गाेवा - अंबरनाथ १७०, कल्याण, माथेरान - १५०, पेण १४०, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, वसई प्रत्येकी १३०, बेलापूर, कर्जत, मुंबई, ठाणे, उरण प्रत्येकी १२०, खालापूर पनवेल प्रत्येकी ११०, वाडा १००, माेखाडा ९०, विक्रमगड ८०, अलिबाग, जव्हार राेहा प्रत्येकी ७०. मध्य महाराष्ट्र ः नेवासा १९०, राहुरी, शेवगाव प्रत्येकी १४०, नगर १३०, श्रीरामपूर, त्र्यंबकेश्वर १२०, अकाेले, पाथर्डी ११०, इगतपुरी, लाेणावळा, नांदगाव, पारनेर, शिरूर, घाेडनदी, श्रीगाेंदा १००, कर्जत, सुरगणा ९०, जामखेड, पारेळा, पुणे, शिरपूर प्रत्येकी ८०. मराठवाडा ः गंगापूर १६०, अंबड १३०, सेलू, वैजापूर १२०, मंठा, पैठण प्रत्येकी १००, घनसावंगी ९०, सेनगाव ७०,  विदर्भ ः लाेणार ९०, देऊळगावराजा ५०.  घाटमाथा ः धारावी १९०, लाेणावळा, अम्बाेणे, भिवपुरी, ताम्हिणी प्रत्येकी ११०, दावडी, खाेपाेली प्रत्येकी १००, वळवण ९०, डुंगरवाडी, खंद ८०. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ः विहार १९०, तुलसी १५०, भांडूप १४०, भातसा, मध्य वैतरणा १३०, अप्पर वैतरणा १२०, तानसा ११०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT