Mobile Raswanti became the basis of agriculture
Mobile Raswanti became the basis of agriculture 
मुख्य बातम्या

 मोबाइल रसवंती ठरली शेतीला आधार 

टीम अॅग्रोवन

आर्णी, जि. यवतमाळ ः रोजगार आणि नोकरीच्या शोधात अनेक युवक तरुण असताना एका युवा शेतकऱ्याने मात्र हातावर हात धरून न राहता, नोकरीसाठी हेलपाटे न मारता. मोबाइल रसवंतीच्या माध्यमातून उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून घेतला आहे. दत्ता रामराव राऊत, असे या उद्यमशील युवकाचे नाव असून, तो आर्णी तालुक्‍यातील सायखेड गावातील रहिवासी आहे.  दत्ता राऊत यांच्याकडे अवघी चार एकर शेती. कुटुंबात वडील रामराव राऊत, आई रुख्मा, पत्नी कल्पना, पाच वर्षांची मुलगी खुशी तर तीन वर्षांचा मुलगा विश्‍वजित अशा सहा जणांचा समावेश आहे. जेमतेम शेतीधारणेतील उत्पादकतेच्या बळावर सहा जणांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणे नजीकच्या काळात आव्हानात्मक ठरत होते. त्यातच गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलांमुळे शेतीक्षेत्रातही अनिश्‍चिततेचे वार वाहत आहे. परिणामी, उत्पादकता खर्चाची देखील भरपाई अनेकदा झाली नाही. त्यामुळे दुसऱ्या हंगामाची सोय उसनवारीच्या बळावरच होत होती. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या गरजा आणि रोजच्या खर्चासाठी लागणारा पैसा कोठून उभा करायचा, अशा विवंचनेत दत्ता राऊत होते. यावर मात करावी म्हणून त्यांनी शेतीपूरक व्यवसायाचा विचार सुरू केला. त्याकरिता अवघ्या १५ हजार रुपयांत जुन्या मोटारसायकलची खरेदी त्यांनी केली. वीस हजार रुपयांना उसाचा रस काढण्याचे संयंत्र घेण्यात आले. मोटारसायकलवर हे संयंत्र बसविण्यासाठी लावलेल्या जाळीवर ४० हजार रुपयांचा खर्च झाला. याप्रमाणे ७५ हजार रुपयांत त्यांची मोबाइल रसवंती तयार झाली. 

या गावांत पोहोचते रसवंती  दत्ता राऊत मोबाइल रसवंती घेऊन सायखेडा गावातून सकाळी आठ वाजता बाहेर पडतात. आर्णीसह दिग्रस तालुक्‍यातील महाळुंगी, जोगलदरी, आरंभी, झीरपूर, उमरी, शिरपूर, चिरकुटा, सावंगा या गावांत जात ते रसाची विक्री करतात. दिवसाकाठी ५०० ते ६०० रुपयांचे उत्पन्न होते. दोन लिटर पेट्रोल दुचाकीला रोज लागते. मात्र स्वतःचा व्यवसाय असल्याचे समाधान यातून मिळते, असा आशावाद या तरुण शेतकऱ्याने व्यक्‍त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT