दिवाकर रावते
दिवाकर रावते 
मुख्य बातम्या

राज्याच्या प्रमुखावर गुपचूप दौऱ्याची वेळ का यावी

Vinod Ingole

यवतमाळ : राज्याच्या प्रमुखाला आपल्याच राज्यातील एखाद्या जिल्हयात गुपचूप येऊन जाण्याची वेळ यावी, असा दुर्देवी प्रकार राज्यात यापूर्वी कधीच घडला नाही. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यात असमर्थ ठरल्याने ते जाब विचारतील या भीतीपोटीच मुख्यमंत्र्यांनी गोपनीय दौऱ्याचे पाऊल उचलले असावे, अशी खोचक टीका परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते रविवारी (ता. २२) यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विषबाधितांना भेटण्यासाठी यवतमाळच्या दौऱ्यावर होते. परंतु सत्तेतील मंत्र्यांनादेखील या दौऱ्याची खबर लागू नये याची दक्षता घेण्यात आली. त्यावरूनच मुख्यमंत्री या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दहशतीत होते, ही बाब स्पष्ट होत असल्याचा आरोप श्री. रावते यांनी केला. रावते म्हणाले, यापूर्वी विषबाधित रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर कपाशीची झाडे फेकण्यात आली होती. सदाभाऊ खोत यांच्या दौऱ्यात त्यांच्या अंगावरच फवारणीचा प्रयत्न झाला. या साऱ्याची धास्ती मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि गोपनीय दौरा केला. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीवरूनच त्यांनी तर्क काढले. शासकीय यंत्रणा जर इतकी सजग असती तर मग जिल्ह्यात इतके बळी कसे गेले असते, असा प्रश्‍नही त्यांनी मांडला. 

बळिराजा चेतना झाले नापास उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यात बळिराजा चेतना अभियान राबविले जात आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात यशस्वी शेतीचे मॉडेल विकसित करून ते आदर्श म्हणून राज्यासमोर आणण्याचा उद्देश या अभियानाचा होता. परंतु दुर्दैवाने अभियानाने केवळ वाढत्या मृत्यूचे मॉडेलच जगासमोर आणले. त्यातही विषबाधितांच्या मृत्यूची भर पडली, असा टोलाही दिवाकर रावते यांनी लगावला.  

मुख्यमंत्र्यांकडे व्यक्‍त करणार नाराजी दिवाकर रावते यांच्यासोबत महसूल राज्यमंत्री व यवतमाळचे सहपालकमंत्री संजय राठोड होते. तेसुद्धा यवतमाळात असताना त्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले. त्यांनी देखील याप्रकरणी मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे जाहीर नाराजी व्यक्‍त करणार असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT