temperature
temperature  
मुख्य बातम्या

किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यातच काही ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे, तर बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशाच्या पुढे गेले आहे. सोमवारी (ता. १७) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंडीही गायब झाली असून, बुधवारपर्यंत (ता. १८) किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. निरभ्र आकाशामुळे राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान तिशीपार गेल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. उत्तरेकडून थंड वारे न आल्याने यंदा गारठा कमीच आहे. दिवसाबरोबरच रात्रीही उकाडा वाढला आहे. पहाटेच्या वेळी काही ठिकाणी धुके पडत आहे. सोमवारी (ता.१७) निफाड व नागपूर येथे राज्यातील नीचांक १२.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात कमाल तापमान ३० ते ३६ अंश तर किमान तापमान १५ ते २० अंशांदरम्यान आहे.   सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६(१६.१), नगर -(१५.३), जळगाव ३४.०(१७.०), कोल्हापूर ३३.७(१९.६), महाबळेश्‍वर ३०.२(१७.५), मालेगाव ३३.६, नाशिक ३१.५(१५.९), निफाड ३०.०(१२.०), सांगली ३५.२(१८.४), सातारा ३४.१(१६.८), सोलापूर ३६.३(२०.२), अलिबाग - (२०.५), डहाणू ३१.२(२०.७), सांताक्रूझ ३२.६(१९.८), रत्नागिरी ३३.१(१९.६), औरंगाबाद ३२.८(१७.४), परभणी ३४.५(१६.४), नांदेड ३३.०(१५.०), अकोला ३४.६(१५.७), अमरावती  ३३.६(१६.६), बुलडाणा ३१.०(१७.४), चंद्रपूर ३३.५(१४.०), गोंदिया २९.४(१२.४), नागपूर ३२.१(१२.०), वर्धा  ३२.०(१५.६), यवतमाळ ३१.५(१७.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT