थंडी
थंडी  
मुख्य बातम्या

किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवर

टीम अॅग्रोवन

पुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय, तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किचिंत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर येथे ९.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  सध्या वाऱ्याच्या प्रवाहामध्ये काही प्रमाणात बदल होत असून, वारे उत्तरेएेवजी नैर्ऋत्येकडून वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात बदल होत आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही हळूहळू वाढ होईल. मागील आठवड्यात राज्यातील काही भागांत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. परंतु आता ते विरून गेल्यामुळे पुन्हा थंडी वाढली आहे. कोकणातील किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. रत्नागिरी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. भिरामध्ये १५.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.  कोरड्या हवामानामुळे मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, मालेगाव, नाशिक येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.   सोमवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)  : मुंबई (सांताक्रूझ) १७.०, अलिबाग १८.० (-१), रत्नागिरी १७.१ (-२), भिरा १५.०, डहाणू १७.७ (१), पुणे १०.६, नगर ९.४, जळगाव १३.० (-१), कोल्हापूर १५.९ (१), महाबळेश्वर १३.३, मालेगाव १२.६ (१), नाशिक १०.८ (१), सांगली १३.६, सातारा ११.४ (-२), सोलापूर १६.४, औरंगाबाद १२.०, बीड १०.८ (-३), परभणी (कृषी विद्यापीठ) ८.०, परभणी शहर ११.१ (-४), नांदेड १२.० (-२), उस्मानाबाद १०.४, अकोला १५.५ (-१), अमरावती १४.६, बुलडाणा १५.२, चंद्रपूर ११.० (-५), गोंदिया ९.८ (-४), नागपूर १०.३ (-३), वर्धा १२.१(-२), यवतमाळ १४.० (-२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT