temperature decrease
temperature decrease  
मुख्य बातम्या

नगर येथे हंगामातील नीचांकी ११.२ तापमान

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असतानाच शनिवारी (ता. ३०) नगर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ५ अंशांची वाढ झाली आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.     उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. नगर वगळता सर्वच ठिकाणी किमान तापमान १४ ते २५ अंशांदरम्यान आहे. बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांबरोबर बाष्पदेखील महाराष्ट्रावर येत असल्याने ढगाळ हवामान होत असून, दिवस, रात्रीच्या उकाड्यातही चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना उलटूनही कडाक्याची थंडी पडलेली नाही.    कमाल तापमानाही ३० अंशांच्या पुढे असल्याने दिवस काहीसा चटकाही जाणवत आहे. शनिवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक ३६.२ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातही अद्याप थंडीचा कडाका वाढलेला नसल्याचे चित्र आहे. राजस्थानातील बारमेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. शनिवारी (ता. ३०) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १७.४ (५), नगर ११.२ (-२), धुळे १४.८, जळगाव १८ (५), कोल्हापूर २१.१ (५), महाबळेश्‍वर १६.५ (२), मालेगाव १८.६ (६), नाशिक १७.३ (५), सांगली २१.१ (५), सातारा १७.६ (३), सोलापूर २१.५ (५), अलिबाग २३.६ (४), डहाणू २३ (३), सांताक्रूझ २३ (३), रत्नागिरी २४.८ (४), औरंगाबाद १६.९ (४), परभणी १७.२ (३), नांदेड १७ (३), उस्मानाबाद १४.८ (१), अकोला १६.९ (१), अमरावती १७ (०), बुलडाणा १७.६ (१), चंद्रपूर १८.६ (४), गोंदिया १५.४ (०), नागपूर १५.८ (२), वर्धा १७.५ (२), यवतमाळ १६.४ (१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT