textile mills
textile mills  
मुख्य बातम्या

देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने कार्यरत

टीम अॅग्रोवन

जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने कार्यरत झाल्या आहेत. निर्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे सूतगिरण्यांमधील कामकाजाला गती मिळाली आहे. गिरण्यांमध्ये रोज ८० हजार गाठींचा उपयोग होत आहे.  देशात महाराष्ट्रात सुमारे १४०, गुजरातेत ११५, दाक्षिणात्य भागात ४४०, उत्तरेकडे सुमारे ६० सूतगिरण्या आहेत. या सर्वच सूतगिरण्या ऑगस्टमध्ये ८० टक्के क्षमतेने कार्यरत झाल्या. सध्य या गिरण्या ९५ टक्के क्षमतेने कार्यरत आहे. अर्थातच गेल्या वर्षाच्या तुलनेत सुताचा व्यापार वाढला आहे. सुताची निर्यात १५ टक्के वाढली आहे.  देशात यंदा साडेपाच हजार कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन अपेक्षित आहे. यातील सुमारे २० ते २१ टक्के सुताची निर्यात होईल. देशातून जेवढे सूत निर्यात होईल, त्यातील ८० टक्के सुताचा आयातदार किंवा खरेदीदार चीन असणार आहे. अर्थातच सध्या चीन, व्हीएतनाम, बांगलादेश व तुर्कीमध्ये सुताची निर्यात वेगात सुरू आहे. देशात सुताचे दर सरासरी १७५ रुपये प्रतिकिलो एवढे आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात देशातील वस्त्रोद्योग पूर्णतः ठप्प होता. जूनमध्ये सूतगिरण्या, कापड मिलांची चाके गती घेवू लागली. सद्यःस्थितीत वस्त्रोद्योगात काम वेगात सुरू असून, मजूरटंचाई जाणवू लागली आहे.  भारतीय कापूस स्वस्त रुपया डॉलरच्या तुलनेत मंदी व इतर समस्यांमुळे कमकुवत झाला आहे. परिणामी भारतीय कापूस जगभरात स्वस्त आहे. भारतीय खंडी (३५६ किलो रुई) ३८ हजार ते ३९ हजार रुपयात मिळत आहे. तर सुतही १६५ ते १७५ आणि २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळत आहे. आयातदारांना भारतीय सूत परवडत आहे. यामुळे रुईसह सुताची मागणी वाढली आहे. 

देशात रोज ८० हजार गाठींचा उपयोग देशातील सूतगिरण्यांना रुईची आवश्यकता असते. सध्या रोज किमान ८० हजार गाठींचा (एक गाठ १७० किलो रुई) उपयोग सूत निर्मितीसाठी होत आहे. वस्त्रोद्योगामध्ये स्थिती सुधारत असल्याने यंदा किमान ३०० ते ३०५ लाख गाठींचा उपयोग वस्त्रोद्योगात होईल, असेही सांगितले जात आहे. यामुळे कापसाचे दर वधारण्याचे संकेतही मिळत आहे. 

प्रतिक्रिया आमच्या भागात वस्त्रोद्योग ९५ टक्के क्षमतेने कार्यरत आहे. यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणात कापूस खरेदीला वेग आला आहे. कापूस खरेदी सीसीआय अधिक करीत आहे. निर्यात वाढल्याने सूतगिरण्यांचे कामकाज चांगले सुरू आहे.  - महेश सारडा, अध्यक्ष, भारतीय कापूस संघ

गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सूतगिरण्यांमध्ये कामकाज कमी क्षमतेत सुरू ठेवण्याची वेळ आली होती. नंतर लॉकडाऊनमध्ये तर स्थिती बिकट झाली. पण सध्या चीन, व्हीएतनाम, बांगलादेशातून सुताची चांगली मागणी सुरू आहे. यामुळे सूतगिरणीचे कामकाज वेगात सुरू आहे.  - दीपक पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद-होळ (जि.नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT