दूध अनुदान योजनेला मुदतवाढ; ५ ऐवजी ३ रुपये अनुदान
दूध अनुदान योजनेला मुदतवाढ; ५ ऐवजी ३ रुपये अनुदान 
मुख्य बातम्या

दूध अनुदान योजनेला मुदतवाढ; ५ ऐवजी ३ रुपये अनुदान

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील दूधभुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खाजगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान देण्याची योजना पूर्वलक्षी प्रभावाने पुढील ३ महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ३० एप्रिल २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, या कालावधीसाठी प्रतिलिटर ५ रुपयांऐवजी ३ रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शुक्रवारी (ता.८) या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. राज्यातील दूधभुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खाजगी दूध भुकटी प्रकल्पांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच निर्णयान्वये राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित ३.२ फॅट ८.३ एसएनएफ (गाय दूध) आणि त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दुधासाठी अनुदान देण्यात येत आहे.  दुधाला रास्त भाव देता यावा, या उद्देशाने राज्य सरकारने दूध संघांसाठी प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान देण्याची योजना दोन टप्प्यांत राबविली होती. प्रत्येक टप्पा हा तीन महिने कालावधीचा निश्‍चित केला होता. त्यानुसार ३१ जानेवारी २०१९ रोजी हा दुसरा टप्पा संपला. दर वर्षी पृष्ठकाळात नैसर्गिकरीत्या दूध उत्पादनात वाढ होत असते. त्यानुसार २०१८ च्या पृष्ठकाळातही दुधाचे अतिरिक्त उत्पादन झाले होते.परिणामी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नव्हता. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी १ ऑगस्ट ते चालू वर्षीच्या जानेवारीअखेर या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पिशवीबंद दूध वगळून उर्वरित अतिरिक्त दुधाकरिता प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची योजना राबविली. या योजनेत ४० खासगी व सहकारी दुग्धप्रकल्पांनी सहभाग नोंदविला होता.या सर्व प्रकल्पांना ३१ ऑक्‍टोबर २०१८ पर्यंतचे २२६ कोटी २३ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. त्यानंतर पुन्हा या योजनेला कालावधी आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीच्या अनुदानासाठी आणखी सुमारे २६४ कोटी रुपयांची गरज आहे. हे अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. राज्य विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्य शासनाने पुरवणी मागण्यांद्वारे त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. राज्यात दुधाचा पुष्टकाळ साधारणत: दरवर्षी एप्रिल महिन्यापर्यंत असतो. त्यामुळे सध्याच्या कालावधीतही अतिरिक्त दुधाची परिस्थिती असल्याने या निर्णयानुसार ही मुदत आता ३० एप्रिल २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर दूधभुकटीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दूधभुकटी उत्पादनात वाढ होऊन काहीअंशी दुधाचा वापर दूधभुकटी रूपांतरासाठी होणार आहे. तरीही उर्वरित अतिरिक्त दुधाचा वापर होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन दूध अनुदान दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांऐवजी ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT