दूध दरप्रश्‍नी विदर्भातही होणार ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
दूध दरप्रश्‍नी विदर्भातही होणार ‘स्वाभिमानी’चे आंदोलन 
मुख्य बातम्या

दूध दरप्रश्‍नी विदर्भातही होणार ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

टीम अॅग्रोवन

नागपूर  : दूध दराच्या मुद्यावरून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विदर्भातील दुग्ध उत्पादकांनादेखील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हाक दिली आहे. दुग्धोत्पादकांचे सहकार्य मिळाल्यास विदर्भातदेखील हे आंदोलन तितक्‍याच तीव्रतेने करण्यात येईल, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

गाईच्या दुधाला पाच रुपये थेट अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास सोमवारपासून (ता. १६) मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

दरम्यान, विदर्भातदेखील गाईच्या दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्याने दूध उत्पादकांसमोरील अडचणीत वाढ होत असून अनेक जण या शेतीपूरक व्यवसायापासून दूर जात आहेत. परिणामी विदर्भातदेखील हे आंदोलन तितक्‍याच तीव्रतेने उभारले जावे, अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विदर्भातील दूध दर प्रश्‍नीदेखील हे आंदोलन होईल, असे सांगितले.

शेती प्रश्‍नांवर पश्‍चिम महाराष्ट्राच्या तोडीचे आंदोलन विदर्भात करण्यात आले. परिणामी विदर्भात संघटनेला अद्यापही अपेक्षित जनाधार मिळालेला नाही. तरीसुद्धा अमरावतीमध्ये देवेंद्र भुयार, बुलडाण्यात रविकांत तुपकर, यवतमाळमध्ये मनीष जाधव तर अकोल्यात आता नव्याने चंद्रशेखर गवळी यांनी स्थानिक स्तरावर विविध शेती प्रश्‍नांवरून प्रशासनाशी दोन हात करीत संघटनेचे अस्तित्व बऱ्याच अंशी टिकवून ठेवले आहे. या माध्यमातूनच आता काही प्रमाणात संघटनेने विदर्भात आपले पाय रोवण्यास सुरवात केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT