'दूधाला दर मिळालाच पाहिजे'
'दूधाला दर मिळालाच पाहिजे' 
मुख्य बातम्या

'दूधाला दर मिळालाच पाहिजे'

सकाळ वृत्तसेवा
   कऱ्हाड, जि. सातारा ः सरकारी आदेशाला न जुमानता दुध उत्पादक शेतकऱ्यांकडुन २१ ते २२ रूपये प्रती लीटर एवढ्या अल्प दराने दुध खरेदी करत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील कऱ्हाड,पाटण, सातारा, कोरेगावसह अन्य तालु्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी  उंब्रज (जि.सातारा) येथे घोषणाबाजी करत त्यांनी दूध रस्त्यावर ओतून ओतून निषेध व्यक्त केला. यावेळी शासनाच्या 'कोण म्हणत देत नाही आर घेतल्याशिवाय राहत नाही', 'दूधाला दर मिळालाच पाहिजे' अशा घोषणांनी परिसर दमाणून गेला.    दुग्धविकास मंत्री  महादेव जानकर यांनी गाईच्या दुधास फॅट ३.५, ८.५ प्रमाणे दुध खरेदी दर २७ रूपये प्रती लीटर असा जाहीर केला  असताना देखील आपल्या जिल्ह्यात असलेल्या खाजगी व सहकारी दुध संघ सरकारी आदेशाला न जुमानता दुध उत्पादक शेतकऱ्यांचे दुध २१ ते २२ रूपये प्रती लीटर अशा अल्प दराने  खरेदी करत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कऱ्हाडसह पाटण तालुका व सातारा जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी, सभासद  संघटीत होऊन घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांनी यांनी दूध दराबाबत काढलेल्या मोर्चास चोरे रस्ता येथून सुरवात झाली. यामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चा सेवा रस्त्यावरुन बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यामध्ये जमलेल्या शेतकऱ्यांना यावेळी इंद्रजीत जाधव, विजय पाटील, लालासाहेब यादव, कृष्णत जाधव, यांनी मार्गदर्शन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT