Milk collection in Parbhani increased by 10,000 liters
Milk collection in Parbhani increased by 10,000 liters 
मुख्य बातम्या

परभणीत दूध संकलनात १० हजार लिटर वाढ

टीम अॅग्रोवन

परभणी : शासकीय दूध योजनेअतंर्गंत परभणी येथील दुग्धशाळेत पाथरी येथून दूध पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात २ लाख ११ हजार ६४९ लिटर दुधाचे संकलन झाले. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत दूध संकलनात १० हजार २६ लिटरने वाढ झाली आहे.

शासकीय दुग्धशाळेतील दर परवडत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी जिल्ह्यात सुरु झालेल्या खासगी डेअरीत दूध घालत आहेत. गेल्या वर्षभरापासून संकलित दुधाची देयके शेतकऱ्यांना विहित मुदतीत दिली जात नाहीत.

गाव स्तरावरील प्राथमिक सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थांचे कमिशन, वाहतूक वाहन भाडे वेळेवर अदा केली जात नाहीत. त्यामुळे शासकीय दुग्धशाळेतील दूध संकलनाला घटीचे ग्रहण लागले आहे. त्याच बरोबर दूध संकलनात वाढ झाल्यानंतर ते अतिरिक्त ठरवून स्वीकारले जात नाही. सदोष यंत्रसामग्रीमुळे दर्जेदार दुधाला देखील कमी दर दिले जातात. त्यामुळे कंटाळलेले दूध उत्पादक खासगी डेअऱ्यांकडे वळले आहेत. 

कर्मचारी, अधिकाऱ्यांची मनमानी, शीतकरण केंद्रांवरील तोकडी यंत्रसामग्री, त्यामुळे होणारी दुधाची नासाडी, या बाबी घट होण्यात कारणीभूत ठरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून पाथरी येथील शीतकरण केंद्रातून होणारा दूध पुरवठा बंद झाला होता. तो सप्टेंबर महिन्यात सुरु झाला आहे. त्यामुळे दूध संकलनात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे. 

जून महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यातून दूध पुरवठा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात परभणी, पाथरी, गंगाखेड, नांदेड येथील शीतकरण केंद्रांचे मिळून एकूण २ लाख ११ हजार ६२३ लिटर दूध संकलन झाले होते. ऑक्टोबर महिन्यात परभणी, गंगाखेड, नांदेड येथील शीतकरण केंद्रावरील दूध संकलनात घट झाली आहे.

शीतकरण केंद्र दूध संकलन
परभणी ९६६४६
पाथरी ४३९१०
गंगाखेड ४५९३५
नांदेड १९९२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT