Migration of thousands of laborers in Pusad taluka 
मुख्य बातम्या

पुसद तालुक्यातील हजारो मजुरांचे स्थलांतर

आरेगाव, जि. यवतमाळ : पोटाची खळगी भरण्यासाठी पुसद तालुक्यातील हजारो मजुरांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे धाव घेतली आहे.

टीम अॅग्रोवन

आरेगाव, जि. यवतमाळ : पोटाची खळगी भरण्यासाठी पुसद तालुक्यातील हजारो मजुरांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे धाव घेतली आहे. सप्टेंबर महिन्यातच  बाहेरील कारखान्याचे मुकादमांनी पुसद येथील लॉजमध्ये मुक्कामी राहून पुसद तालुक्यातील माळपठार, तांडे, वाड्यांवर फिरून जोडप्यांना ५० हजार रुपयेपर्यंत अगाऊ रक्कम दिली आहे.

दसऱ्यापासून कारखान्यांचे धुराळे पेटताच मजुरांचे जत्थेच्या जत्थे विविध कारखान्यांवर मुकदमाने पाठविलेल्या वाहनातून संसारपयोगी सामान भरून रवाना झाले. रोजगाराअभावी मजुरांचे स्थलांतर झाल्याने तांडे व वाड्यांत केवळ वृद्ध माणसे दिसत आहेत. सोयाबीन कापणीचा हंगाम संपताच मजुरांच्या हाताला काम मिळेनासे होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर मजुरवर्ग वीटभट्टी, ऊसतोड व मुंबई, पुणे या महानगराकडे रोजगाराच्या शोधात रवाना होतो.

तालुक्यातील ७२ हजार हेक्टर पेरणी योग्य जमिनीपैकी केवळ दहा ते बारा हजार हेक्टर जमीन बारमाही ओलीताखाली येते. पुस प्रकल्पावरील डावा व उजव्या कालव्यात सुटणाऱ्या पाण्यावर साडेआठ हजार हेक्टर जमिनीचा यात समावेश आहे. शेतात बारमाही काम नसल्याने मजुरवर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी नाइलाजास्तव स्थलांतर करतो.

सहकारक्षेत्रातील वाताहतीमुळे जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने डबघाईस आले. एक कारखाना विकावा लागला. दुसरा कारखानाही त्याच मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या घामातून उभे राहिलेले सहकारक्षेत्रातील उधोग राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे बंद होऊन शेतकरी देशोधडीला लागले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Labour Shortage: आंतरमशागतीला वेग; बैलजोडीची टंचाई, मजुरीचे दर वाढले

Agriculture Department: नव्या आकृतिबंधाचा सहायक कृषी अधिकाऱ्यांना फटका

Shivnibandh Fish Seed Centre: ‘शिवनीबांध मत्स्यबीज’ची निविदा स्थगित

Nanded District Bank Chairman: नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार तुषार राठोड

Farm Loan Waiver: दोन ते चार दिवसांत ५ ते १० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कृषिमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT