मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
मुख्य बातम्या

मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देणार ः मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन

मुंबई : मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. सरकारने कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण द्यावे, असा निर्णय घेतला आहे. आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. यासंदर्भात मान्यवरांकडून अनेक सूचना आल्या. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, आंदोलकांनी आंदोलनादरम्यान हिंसा, आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी येथील सह्याद्री अतिथिगृहात गुरुवारी (ता.२) बैठक पार पडली. बैठकीसाठी मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्य सरकारने कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण द्यावे, असा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनादरम्यान जमावाने कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नये. तसेच, कोणीही आत्महत्या करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बैठकीत मान्यवरांकडून सूचना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सकल मराठा समाजाची हिंसक आंदोलने ही राज्य सरकारसाठी चिंतेची बाब झाली आहे. या हिंसाचारामागे 'बाहेरचा हात' असल्याचा पोलिसांना संशय आहे. मराठा आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समाजकंटक अस्थिरता निर्माण करण्याचा डाव साधत आहेत. त्यांना हिसका दाखवण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 'स्पेशल १६' तुकड्या पाठवण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राला केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ९ आणि १६ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनांदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT