बार्शीटाकळी तहसील कार्यालयात पीकविमा तक्रार निवारण समितीची बैठक
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात पीकविमा तक्रार निवारण समितीची बैठक 
मुख्य बातम्या

बार्शीटाकळी तहसील कार्यालयात पीकविमा तक्रार निवारण समितीची बैठक

टीम अॅग्रोवन

अकोला  ः खरीप हंगामात राबविल्या जात असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अनुषंगाने बार्शीटाकळी तहसील कार्यालयात शुक्रवारी (ता. ११) तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली.  सभेच्या सुरवातीला योजनेबद्दल तसेच तक्रार निवारण समितीचे कार्याबाबत समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांनी माहिती दिली. अमोल पातुर्डे यांनी वैयक्तिक नुकसान भरपाईकरिता एकूण प्राप्त तक्रारींचे वाचन करून सदर तक्रारी विमा कंपनी प्रतिनिधींकडे हस्तांतरित करण्यात आल्या. प्राप्त तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करणार असल्याचे यावेळी विमा प्रतिनिधीने सांगितले. महादेव गावंडे, अनिल ढोरे, गजानन खेडकर यांनी पिक कापणी प्रयोगाबद्दल तसेच तालुक्यामध्ये आयोजित गावनिहाय पीक कापणी प्रयोगाबाबत सभागृहात माहिती दिली. या बैठकीला शेतकरी प्रतिनिधी गजानन वाघमारे, गजानन आखरे, गणेश नानोटे, गजानन म्हैसने, बँक प्रतिनिधी श्री. निळखन, रवींद्र महल्ले आदी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन करून कृषी सहायक गजानन खेडकर यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

Department Of Water Resources : ‘कृष्णा खोरे’ची ६६८ कोटींची पाणीपट्टी वसुली

SCROLL FOR NEXT