Measures taken by the administration to sell vegetables in Akola
Measures taken by the administration to sell vegetables in Akola 
मुख्य बातम्या

अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी प्रशासनाकडून उपाययोजना 

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून याचा शहरी भागात शेतमाल आयातीवर तसेच विक्रीवर परिणाम झाला होता. मात्र, मागील दोन दिवसांत शासनाने भाजीपाल्याची वाहतूक तसेच शहरात विक्रीसाठी खबरदारी घेण्याबाबत निर्देश दिल्यानंतर परिस्थिती थोडी सुधारत आहे. अकोल्यात महापालिकेने भाजीपाला विक्रीसाठी विविध भागात ठिकाणे निश्चित केली आहेत. 

जिल्ह्यात अन्नधान्य, भाजीपाला, फळे तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंची मुबलक उपलब्धता आहे. तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. विनाकारण खरेदीसाठी गर्दी करू नये. दुकानांवर खरेदीसाठीही दुकानदारांनी ग्राहकांचे परस्परांमधील अंतर राखूनच खरेदी विक्रीचा व्यवहार करावयाचा आहे. त्याची खबरदारी घ्यावयाची आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

आता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या नेतृत्वात भाजीपाला विक्रीचे नियोजन केले जात आहे. जनता बाजारात सकाळी सात वाजेपर्यंत लिलावाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यानंतर भाजीपाल्याची किरकोळ विक्रीसाठी शहरात सर्वच ठिकाणी मुभा देण्यात आली आहे. फक्त विक्री करताना खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात. कोठेही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना महापालिका आयुक्त कापडणीस यांनी केली. 

कोट--  अकोला महानगरात शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीला आणायला कुठलेही बंधन नाही. ठोक विक्रीची प्रक्रिया पहाटे सुरू होऊन सहा वाजेपर्यंत पूर्ण केली जात आहे. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी विक्रेते ग्राहकांना भाजीपाला विकत आहेत. कोणीही घाबरुन होण्याची गरज नाही. ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंबाबत कोणालाही पळापळ करण्याची, घाबरण्याची आवश्यकता नाही.  - संजय कापडणीस, आयुक्त , महापालिका, अकोला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT