मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात मिळणार ५० टक्के अनुदान  Materials under Honey Center Scheme 50% grant in the form of
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात मिळणार ५० टक्के अनुदान  Materials under Honey Center Scheme 50% grant in the form of 
मुख्य बातम्या

मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात मिळणार ५० टक्के अनुदान 

टीम अॅग्रोवन

नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मध केंद्र योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणूक यावर आधारित आहे. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती इत्यादींचा समावेश असणार आहे.  जिल्ह्यातील पात्र व्यक्ती किंवा संस्थांनी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. वैयक्तिक मधपाळ या घटकातील अर्जदार हा साक्षर असून, त्याचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. याकरिता १०दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ या घटकासाठी वयोमर्यादा २१ वर्षे व किमान १० वी पास व सदर घटकाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती जमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असणे आवश्यक आहे. या बरोबरच लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.  केंद्र चालक संस्था या घटकासाठी संस्था नोंदणीकृत व संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान १ हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. या बरोबरच एक एकर शेतजमीन स्वमालकीची किंवा भाड्याने घेतलेली व संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवा असावी. विशेष छंद प्रशिक्षण या घटकांतर्गत २५ रुपये प्रवेश शुल्क भरणे आवश्यक आहे. शाळा, कॉलेजातील विद्यार्थी, नोकरदार किंवा सेवानिवृत्त कर्मचारी, वयोवृद्ध अशा इच्छुक लाभार्थ्यांनी ५दिवस प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. शास्त्रीय पद्धतीने आग्या मध संकलन प्रशिक्षणासाठी लाभार्थीं साक्षर असावा व वयोमर्यादा १८ ते ५० वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच या घटकासाठी किमान ५ दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांची प्रशिक्षण घेण्यासाठीची निवड मंडळामार्फत निश्चित केलेल्या ठिकाणी घेण्यात येणार असून, प्रशिक्षण घेण्यापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्याबाबत मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य असणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा  या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रूम नं. १६, तिसरा मजला, उद्योग भवन, आय.टी.आय. सिग्नल जवळ, सातपूर, नाशिक ७, दूरध्वनी क्र.०२५३–२३५२७३६ तसेच संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं.५, मु. पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा-४१२८०६, दूरध्वनी-०२१६८–२६०२६४ यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT