Mask production for Corona Warriors by thirteen self-help groups
Mask production for Corona Warriors by thirteen self-help groups 
मुख्य बातम्या

कोरोना वॉरियर्ससाठी तेरा बचतगटांव्दारे मास्क निर्मिती 

टीम अॅग्रोवन

अमरावती ः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क उपयुक्‍त ठरत आहेत. त्यामुळे मास्कची वाढती मागणी पाहता जिल्ह्यात १३ बचतगटांनी मास्क निर्मितीचे काम हाती घेतले आहे. यातून या बचतगटांना आर्थिकस्त्रोतही उपलब्ध झाला आहे. 

दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियाना अंतर्गंत अमरावती मधील १३ महिला बचतगटांचा समूह अमरावती महापालिकेसाठी मास्क बनविण्याचे काम करीत आहे. या गटांनी महापालिकेसाठी आतापर्यंत दहा हजार मास्क तयार केले आहेत. पालिकेअंतर्गंत काम करणारे डॉक्‍टर, आरोग्य सेविकांसह सफाई कर्मचारी, संचारबंदी दरम्यान जिल्ह्यात अडकलेले नागरिक, निराधारांना हे मास्क मोफत वितरित करण्यात येत आहेत. 

लक्ष्मी महिला बचतगट, पूजा महिला बचतगट, दत्तप्रभु महिला बचतगट, त्रिवेणी महिला बचतगट, रेणुका महिला बचतगट, यश महिला बचतगट, ओम, वैभवलक्ष्मी, शारदा, अनमोल, प्रगती, यश महिला बचतगटाव्दारे हे काम होत आहे. सहा तास काम करून त्या माध्यमातून ६०० ते ८०० मास्क तयार करण्यात येतात. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार हे मास्क तयार करण्यात येत आहेत. 

हे मास्क कापडी असल्यामुळे त्यांचा पुनर्वापरही करता येणे शक्‍य आहे. लॉकडाऊनच्या काळात या गटांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक विवंचनाही काही प्रमाणात दूर झाली आहे. तसेच त्यांना आपात्कालीन परिस्थितीत सेवा देण्याची संधीही मिळाली असल्याची भावना अभियानाचे शहर प्रकल्प अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी व्यक्‍त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT