Marketing letter for insurance to market committee employees
Marketing letter for insurance to market committee employees 
मुख्य बातम्या

बाजार समिती कर्मचाऱ्यांना विम्यासाठी ‘पणन’चे पत्र

टीम अॅग्रोवन

पुणे ः कोरोना संकटात बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरविण्याबाबत पणन संचालक सतीश सोनी यांनी प्रधान सचिवांना विमा आणि एक अतिरिक्त भत्ता लागू करण्याबाबतचे पत्र दिले आहे. याबाबत राज्य बाजार समिती कर्मचारी संघाने मागणी करत, विमा न उतरविल्यास बाजार समित्या बंद करण्याचा इशारा दिला होता. 

कोरोना संकटात शहरांमधील फळे भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत राहावा आणि शेतीमालाचे देखील नुकसान होऊ नये यासाठी बाजार समित्यांचा समावेश अत्यावश्‍यक सेवेत केला आहे. यामुळे कर्मचारीदेखील अत्यावश्‍यक सेवेत असून, रात्रीपासून ते दुपारपर्यंत कर्मचारी मोठी जोखीम घेत, बाजार समित्या सुरू ठेवत शेतीमालाचा पुरवठा सुरळीत करत आहेत. राज्यात सात हजार कर्मचारी कार्यरत असून, या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव होण्याचा धोका नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे पणन संचालक यांना संघाच्या वतीने पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. 

बाजार समिती कर्मचारी अत्यावश्यक सेवेत काम करत असताना सुद्धा शासनाने त्यांना विमा कवच दिलेले नाही. तरी महाराष्ट्रातील बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाखांचा विमा व इतर सुविधा तत्काळ लागू करण्यात याव्या, अशी मागणी पणन संचालक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season : अंदाजापेक्षाही १३१ लाख टन जादा उसाचे गाळप

Literacy Mission : सव्वाचार लाख निरक्षरांच्या नावे लागले आता साक्षरतेचे बिरुद

Pre Monsoon Rain : विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस

Egg Market : उत्पादन घटल्याने अंड्याचे दर ५०० पार

Price Protection : शेतीमालाच्या दर संरक्षणात बाजार समित्या अपयशी

SCROLL FOR NEXT