Market committees closed in Nashik district till April 4
Market committees closed in Nashik district till April 4 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील चार एप्रिलपर्यंत बाजार समित्या बंद

टीम अॅग्रोवन

नाशिक : गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती कामकाजात अस्थिरता होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दरात फटका सहन करावा लागला.  मात्र त्यातच आता आर्थिक वर्षअखेर, शनिवार व रविवार यासह शासकीय सुट्ट्या, यामुळे बाजार समित्यांचे कामकाज ४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. काही ठिकाणी हे काम १० दिवसांपर्यंत बंद राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करताना मोठी अडचण होणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बाजार समिती परिसर बंद, तर पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे बाजार समितीच्या कामात व्यत्यय येत गेला. कामात सुलभता येण्यासाठी मजूर टंचाईचे कारण देत खुले कांदा लिलाव गोणीत सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांचा विरोध झाल्यावर पुन्हा ते खुल्या पद्धतीने सुरू झाले. आता पुन्हा ऐन काढणी हंगामात कामकाज बंद राहील.  

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्चअखेर केले जाणारे ऑडिट, बँकांचे बंद असणारे व्यवहार अशी करणे देत बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद ठेवण्यात येतात. मात्र काही ठिकाणी ८ ते  १० दिवस काम बंद राहील. कांदा उत्पादक पट्ट्यात काढणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे आर्थिक गरज व अवकाळीमुळे कांद्याची टिकवणक्षमता घटली. परिणामी शेतकरी कांदा विक्री करताना करताना दिसून येत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर कांदा कसा विकायचा, असा प्रश्न आहे. 

आठ दहा दिवस कामकाज बंद राहणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे आहे. त्यामुळे बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची मागणी विचारत घेऊन किमान दोन दिवस बंद  ठेवण्याचा निर्णय व्हावा. संगणकीकरण होऊनही जास्त दिवस बाजार बंद ठेवणे अडचणीचे आहे. बाजार समिती व व्यापाऱ्यांनी तसे नियोजन करावे. - निवृत्ती गारे, सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना, उत्तर महाराष्ट्र.

बाजार समित्या बंदची स्थिती 

लासलगाव  २७ ते ४
पिंपळगाव बसवंत २९ ते ४
नामपूर  २६ ते ४
उमराने २७ ते ४
मनमाड  २९ ते ४
येवला २५ ते ४
सिन्नर २७ ते ४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT