मराठवाड्यातील धरणांमध्ये  ६७ टक्के पाणीसाठा
मराठवाड्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठ्यात गत आठवड्याच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये ३ नोव्हेंबरअखेर ६४.९१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध आहे. २७ ऑक्‍टोबरअखेर उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का ६५.२१ टक्‍के होता. मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये ६६.४२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. या प्रकल्पांपैकी माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सिनाकोळेगाव प्रकल्प तुडुंब भरले असून, येलदरी व उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात प्रत्येकी केवळ १४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. निम्न मनारची स्थिती फारशी बरी नसून, या प्रकल्पातही केवळ २३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी सात मध्यम प्रकल्पात शून्य टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सहा; तर नांदेड जिल्ह्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील सोळा मध्यम प्रकल्पांपैकी लाहुकी, गिरिजा, वाकोद, अंजना, पळशी, टेंभापुरी, नारंगी या प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठाच झाला नाही. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील महालिंगी मध्यम प्रकल्पातही अख्खा पावसाळा लोटूनही उपयुक्‍त पाणीसाठ्याचा थेंबही साठला नाही. अकरापैकी केवळ सात प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा असून, ७४३ पैकी  ३२२ लघुप्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. ७५ पैकी ४५ मध्यम प्रकल्पांतही ३ नोव्हेंबरअखेर ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठ्याची नोंद घेतली गेली आहे. १५ मध्यम, २२९ लघू, तर ३ मोठ्या प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. पावसाचा टक्‍का बरा दिसत असला तरी मोजक्‍या मोठ्या व काही मध्यम प्रकल्पांची स्थिती चिंता वाढविणारी आहे. 

२६ मध्यम प्रकल्प तुडुंब मराठवाड्यातील जालना वगळता सातही जिल्ह्यांतील २६ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील १६ पैकी ११, उस्मानाबादमधील १७ पैकी १०, लातूरमधील ८ पैकी २, नांदेडमधील ९ पैकी २; तर औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT