मराठवाड्यात ७८ टक्‍के पेरण्या उरकल्या
मराठवाड्यात ७८ टक्‍के पेरण्या उरकल्या 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात ७८ टक्‍के पेरण्या उरकल्या

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रापैकी ७८.५३ टक्‍के क्षेत्रावर खरिपाची पेरणी उरकली आहे. पेरणी उरकलेल्या ३६ लाख ६९ हजार ४७१ हेक्‍टर क्षेत्रापैकी १४ लाख ६९ हजार ९६७ हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी तर १२ लाख २५ हजार ४३३ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

यंदा मराठवाड्यात उस वगळून खरिपाचे ४६ लाख ७२ हजार ५५४ हेक्‍टरवर खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या तुलनेत ३६ लाख ६९ हजार ४७१ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी आटोपली. यामध्ये ज्वारी, मका, बाजरी, भातासह खरिपातील तृणधान्याची ३ लाख ५८ हजार ६७२ हेक्‍टरवर पेरणी झाली. यामध्ये ज्वारी ८९ हजार १७५ हेक्‍टरवर, बाजरी ६९ हजार ३१२ हेक्‍टरवर तर मकाची १ लाख ९४ हजार २०८ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. कडधान्यांचा पेरा ५ लाख ९५ हजार १८० हेक्‍टरवर झाला.

जिल्हानिहाय पेरणी झालेले क्षेत्र व टक्‍केवारी (हेक्‍टरमध्ये)
जिल्हा पेरणी झालेले क्षेत्र टक्‍केवारी
औरंगाबाद ५ लाख ४० हजार ५९६ ७६.७९
जालना ४ लाख १४ हजार ४७४ ७२.९५
बीड ५ लाख ३२ हजार ९३९ ७५.१३
लातूर ४ लाख ६५ हजार १६२ ७७.०३
उस्मानाबाद ३ लाख ६२ हजार ७०० ७६.७४
नांदेड ६ लाख ६६ हजार ३४८ ८०.७९
परभणी ३ लाख ७७ हजार ९९१ ५९.७८
हिंगोली ३ लाख १६ हजार ५८६ ८२.२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT