माणिकराव ठाकरे
माणिकराव ठाकरे 
मुख्य बातम्या

गारपीटग्रस्तांना ६० हजारपर्यंत मदत द्या ः माणिकराव ठाकरे

टीम अॅग्रोवन

अकोला ः राज्यात गेल्या दोन दिवसांतील गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी लाख ते दीड लाखापेक्षा अधिक नुकसान झाले. फळबागांचे नुकसान याहीपेक्षा अधिक अाहे. त्यामुळे शासनाने गारपीटग्रस्तांना किमान ५०ते ६० हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत दिली पाहिजे. अापण ही मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याची माहिती विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिली.  सोमवारी श्री. ठाकरे यांनी वाशीम जिल्ह्यतील रिसोड मतदार संघात गारगीपटग्रस्त भागाला भेटी दिल्या. या वेळी अामदार अमित झनक आदी त्यांच्यासोबत होते. श्री. ठाकरे म्हणाले, की वादळी वारा व पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अाहे. गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांची हानी अधिक झालेली अाहे. सोबतच द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले अाहे. ही पाहणी अाटोपल्यानंतर अापण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या हेक्टरी ५० ते ६० हजार रुपयांची मदत तातडीने देण्याबाबत मागणी करणार अाहोत, असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.  गारपिटीमुळे मृत्यू झालेल्या यमुनाबाई हुंबाड यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यासोबतच केनवड, जोगेश्वरी, जायखेडा, तपोवन, अांचळ, नेतन्सा, लेहणी, वडजी, करंजी गरड, बाळखेडा, महागाव या गावात पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT