माणिक शिनगारे
माणिक शिनगारे 
मुख्य बातम्या

माणिक शिनगारे यांच्या शोध प्रबंधाला मृदा विज्ञान संस्थेचे सुवर्णपदक

टीम अॅग्रोवन

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत परभणी येथील कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी माणिक शिनगारे यांनी बीटी कपाशीच्या पिकासाठी जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणे या विषयावर सादर केलेल्या शोध प्रबंधास भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे (इंडियन सोसायटी आॅफ साॅईल सायन्स) पश्चिम विभागातील उत्कृष्ट प्रबंधाचे पारितोषिक मिळाले. माणिक बंडू शिनगारे (रा. दस्तापूर, जि. परभणी) यांना पदव्युत्तर शिक्षणक्रम प्रबंधाकरिता हे पारितोषिक मिळाले आहे. शिनगारे यांनी ‘वनामकृवि’तील मृदाविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सय्यद ईस्माइल यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर पदवी संपादन केली. सूक्ष्मजीवांचा वापर करून पिकांसाठी लागणारे महत्त्वाचे अन्नद्रव्य जस्त (झिंक) याची कपाशीकरिता उपलब्धता वाढविणे या विषयावरील संशोधन प्रबंध राहुरी येथे मृदा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सादर केला. या विषयावर पश्चिम विभागातील पाच विद्यार्थ्यांनी प्रबंध सादर केले. त्यापैकी शिनगारे यांचा प्रबंध उत्कृष्ट ठरल्यामुळे त्यांना सुवर्णपदक आणि प्रशस्तिपत्र असे पश्चिम विभागाचे पारितोषिक जाहीर झाले होते. १३ डिसेंबर रोजी भारतीय मृदा विज्ञान संस्थेच्या कोलकता येथील ८२ व्या अधिवेशनामध्ये संस्थेचे अध्यक्ष डाॅ. एस. के. चौधरी यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या वेळी देशातील नामवंत मृदाशास्त्रज्ञ उपस्थित होते. याबद्दल शिनगारे यांचे ‘वनामकृवि’चे शिक्षण संचालक डाॅ. व्ही. डी. पाटील, डाॅ. सय्यद ईस्माइल यांनी अभिनंदन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT