आंबा
आंबा  
मुख्य बातम्या

मुंबईत १० एप्रिलपासून आंबा महोत्सव

टीम अॅग्रोवन

मुंबई: कोकणातील आंबा थेट ग्राहकांपर्यंत पाेचविण्यासाठी येत्या १० एप्रिल ते २८ मे दरम्यान मुंबईत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने मुंबईत दादर, विलेपार्ले, ठाणे, बोरीवली व मुलुंड या पाच ठिकाणी याचे आयोजन केले जाणार आहे.  कोकणातील आंबा बागायतदारांना यापुढे नव्या युगाची चाहूल घेऊन स्वत:ची विक्री व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरे कोणी शेतकऱ्याला भरपूर भाव देईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. यादृष्टीने गेली काही वर्षे कोकण विकास प्रतिष्ठान आंबा उत्पादक ते ग्राहकांच्या सोयीसाठी आंबा महोत्सव आयोजित करीत आहे. आजपर्यंत अनेक शेतकरी व बागायतदारांना याचा फायदा झाला आहे. गेल्यावर्षी दादर, विलेपार्ले, ठाणे, बोरिवली व मुलुंड या ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आणि त्यात सुमारे अडीच कोटी इतकी विक्री झाली होती. यावर्षीही असाच आंबा महोत्सव १० एप्रिल ते २८ मे २०१९ या कालावधीत कोकण विकास प्रतिष्ठान मुंबईत दादर, विलेपार्ले, ठाणे, बोरीवली व मुलुंड या ठिकाणी आयोजित करणार आहे. आंबा महोत्सव हे नव्या विक्री व्यवस्थेतील पहिले पाऊल आहे. यापुढे अशा आधुनिक विपणन व्यवस्था कोकण विकास प्रतिष्ठान, आंबा उत्पादकांप्रमाणेच दर्जेदार कोकणी पदार्थ उत्पादक व महिला बचत गटांसाठीही राबवणार आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी आंबा महोत्सव सभा, रत्नागिरी, देवगड व मुंबई येथे ठेवण्यात आलेल्या आहेत.  शुक्रवारी (ता. १५ मार्च) सकाळी ११ वाजता माळ नाका, रत्नागिरी आणि शनिवारी (ता. १६ मार्च) सकाळी ११ वाजता पवनचक्की, देवगड तसेच रविवारी (ता. १७ मार्च) सायंकाळी ६ वाजता दादर (प.), मुंबई येथे घेण्यात येणार आहेत. या सभेला जास्तीतजास्त आंबा बागायतदार व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कोकण विकास प्रतिष्ठान, दूरध्वनी क्रमांक ९८६९०१६०९२ यावर संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT