Make 'revenue' popular: Commissioner Gam
Make 'revenue' popular: Commissioner Gam 
मुख्य बातम्या

‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमे

टीम अॅग्रोवन

नाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व प्रदान करते. याचे उत्तम उदाहरण देवमामलेदार यांनी दाखवून दिले होते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २) महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गमे बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी, इगतपुरी प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार रचना पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तहसीलदार पल्लवी जगताप, तहसीलदार राजश्री आहिरराव आणि वेबलिंकद्वारे तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. 

महसूल दिनाचे औचित्य साधून नागरिकांना अधिक कार्यक्षमतेने व जलद सेवा देण्यासाठी अधिकाधिक विषयांमध्ये त्रिस्तरीय कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले

यांचा झाला सन्मान कोरोनाची जबाबदारी सांभाळत इतरही कामे उत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार महसूल दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार पोपटराव सोनवणे, शिपाई अनिल वैद्य, तलाठी सोनाली कोल्हे, कोतवाल मोहन दत्तात्रय कर्वे यांचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार रचना पवार व आभार अपरजिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT