Make agricultural inputs available on the dam: Agriculture Minister Bhuse
Make agricultural inputs available on the dam: Agriculture Minister Bhuse 
मुख्य बातम्या

कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या ः कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन

पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडू नयेत, यासाठी आवश्यकतेनुसार या निविष्ठा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत खते व बी-बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

खरीप हंगाम २०२० नियोजनाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषिमंत्री भुसे यांनी पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा गुरूवारी (ता.२८) घेतली. बैठकीला कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अग्रणी बँकेचे अग्रणी व्यवस्थापक आनंद बेडेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, खरीप हंगामासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित कोणत्याही बाबींची अडचण शेतकऱ्यांना येणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारा कापूस, तूर, मका, ज्वारी, हरभरा आदी शेतमाल येत्या १५ जून पर्यंत खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच माल येत असल्याची पडताळणी करावी. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी शेतमाल व फळपिके नागरिकांना कमी पडू दिले नाही. यात बळीराजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या काळात शेतकऱ्यांचा दोन हजार टन शेतमाल ग्राहकांपर्यंत पोचविण्याचे काम कृषी विभागाने केले. या कामाचे कौतुक करून येणाऱ्या काळात कृषी क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना शेती कामासाठी जाण्या-येण्यास तसेच शेतीसाठी आवश्यक वाहनांना इंधनपुरवठा करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ देऊ नये, अशा सूचना त्यांनी पोलिस विभागासह संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या.

शेतीसाठी युरियाचा ५० हजार टन साठा राज्यात उपलब्ध आहे. तथापि जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढाच व कमीत कमी युरियाचा वापर करावा. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरण्याबाबतही त्यांना प्रोत्साहन द्यावे. शेतकऱ्यांच्या बांधावर आत्तापर्यंत ९६ हजार ९०० टन रासायनिक खते तसेच ४६ हजार ६५५ क्विटंल बियाणे पोचवण्यात आली आहेत. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बैठकीत दिलेल्या सूचना

  • पीककर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा.
  • पीककर्ज टाळाटाळ करणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
  • कोरोना काळात बँकांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी पीककर्ज मागणीसाठीचा एक पाणी अर्ज बँकेमध्ये ऑनलाइन सादर करून त्यावर कार्यवाही करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
  • शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या वतीने आजपासून यू ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले
  • सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उसाचे अधिकाधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करावेत.
  • शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासन व साखर कारखान्यांनी प्रोत्साहनपर उपक्रम राबवावेत
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

    Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

    Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

    Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

    Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

    SCROLL FOR NEXT