राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यता
राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यता 
मुख्य बातम्या

राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यता

वृत्तसेवा

पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. १७) कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात मुख्यत: उघडीप राहण्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा चार ते पाच दिवस दक्षिणेकडे कायम राहणार असून, सध्या द्वारका, अहमदाबाद ठळक कमी दाब क्षेत्रातून बलसोर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, राजस्थान ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात पाऊस ओसरला असून, अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. दिवसभर असलेल्या स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, विदर्भात अनेर ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

  • कोकण :  जव्हार, शहापूर प्रत्येकी २०, चिपळूण, दोडामार्ग, कणकवली, पनवेल, पालघर, वैभववाडी, वेंगुर्ला प्रत्येकी १०.
  • मध्य महाराष्ट्र :  एरंडोल ३०, इगतपुरी २०, चंदगड, दहिगाव, गगनबावडा, महाबळेश्‍वर, पन्हाळा, पेठ प्रत्येकी १०.
  • मराठवाडा :  मंथा २०, औंढा नागनाथ, हिंगोली, प्रत्येकी १०.
  • विदर्भ :  भामरागड ७०, चिखलदरा ४०, अमगाव, आष्टी, चिमूर, एटापल्ली, घाटंजी, गोरेगाव, काटोल, कोर्ची, कुरखेडा, लाखनी प्रत्येकी १०.
  • मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, दोन ते तीन दिवसांत ही प्रणाली विरून जाण्याची शक्यता आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, शनिवारपर्यंत ही प्रणाली ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

    Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

    Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

    SCROLL FOR NEXT