‘महावितरण’च्या वीजबिलांचे लवकरच होणार केंद्रीकरण
‘महावितरण’च्या वीजबिलांचे लवकरच होणार केंद्रीकरण 
मुख्य बातम्या

‘महावितरण’च्या वीजबिलांचे लवकरच होणार केंद्रीकरण

टीम अॅग्रोवन

सोलापूर : राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबिल मिळावे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा. यासाठी वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्याच्या प्रक्रियेस सुरवातही झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत आहे. यामुळे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीजबिलांची छपाईपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. ग्राहकांना वेळेत वीजबिल न मिळाल्यामुळे त्वरित बिल भरण्याकरिता महावितरणकडून देण्यात येणारी सूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) मिळत नाही. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. मोबाईल मीटर रीडिंग ॲपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाइम) मीटर वाचन तसेच चेक रीडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पद्धतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया होईल. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त अचूक बिल मिळणार आहे. तसेच केंद्रातील रांगा कमी होऊन ते भरणे अधिक सोयीचे होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT