मुख्य बातम्या

साखर कारखान्यांकडून ५ रुपये दराने वीज खरेदी

टीम अॅग्रोवन

मुंबई : सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज महावितरणने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली असून, ५ रुपये युनिटप्रमाणे खरेदी करार होणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महावितरणने उसाच्या चिपाडाद्वारे निर्माण होणारी वीज सहवीज निर्मिती प्रकल्पातून ५ रुपये कमाल या दराने विकत घेण्यासाठी शासनाची परवानगी मागितली होती. महावितरणच्या संचालक मंडळाने उसाच्या चिपाडाद्वारे व कृषिजन्य अवशेषांवर आधारित स्रोतांमधून स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे वीज खरेदीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने सहमती दर्शवली होती. ऑक्टोबर ते मे या कालावधीत कृषी ग्राहकांची विजेची मागणी लक्षात घेता सहवीज निर्मिती प्रकल्पांतून मिळणाऱ्या विजेचा दर ५ रुपये प्रतियुनिट इतका करून निविदा मागविण्यात याव्या, असा प्रस्ताव महावितरणने सादर केला होता. उसाच्या चिपाडावर १००० मेगावॉटचे सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय २००८ मध्येच शासनाने घेतला होता. महावितरणने आतापर्यंत ११३ उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पांसोबत वीज खरेदी करार केले आहेत. महावितरणने शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट प्राप्त केले आहे. सध्या सौर व बिगर सौर ऊर्जेचे दर हे स्पर्धात्मक निविदेद्वारे निश्चित केले जातात, त्यामुळे सौर व पवन ऊर्जेचे दर मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. त्यानुसार राज्यातही सौर व पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांशी स्पर्धात्मक निविदेद्वारे वीज खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वीज खरेदी करारास शासनाची मान्यता घेण्यात यावी, असे शासनाने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT