नवनिर्मितीच्या आदेशासाठी महाजनादेश ः मुख्यमंत्री फडणवीस
नवनिर्मितीच्या आदेशासाठी महाजनादेश ः मुख्यमंत्री फडणवीस 
मुख्य बातम्या

नवनिर्मितीच्या आदेशासाठी महाजनादेश ः मुख्यमंत्री फडणवीस

टीम अॅग्रोवन

गुरुकुंज मोझरी, जि. अमरावती ः दुष्काळमुक्‍त महाराष्ट्र, शेतकरी, शेतमजुरांचे हित, युवकांच्या हाताला काम देण्याचा, नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीचा आदेश घेण्याकरिता ही महाजनादेश यात्रा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

या वेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, आशिष शेलार, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, प्रवीण पोटे, सुनील देशमुख, वर्धा खासदार रामदास तडस, पक्षाचे सरचिटणीस विजय पुराणिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘जनतेचा पुन्हा आदेश आणि आशीर्वाद घेण्याकरिता ही महाजनादेश यात्रा आहे. समृद्ध गाव, राज्य आणि देशाचे तत्त्वज्ञान ग्रामगीतेतून तुकडोजी महाराजांनी सांगितले. त्यामुळेच यात्रा सुरू करण्याकरिता तुकडोजी महाराजाच्या मोझरीची निवड केली. ६०-७० वर्षांतील समस्या पाच वर्षांत सुटू शकणार नाहीत. परंतु गेल्या १५ वर्षांत सुटले नसतील इतके प्रश्‍न पाच वर्षांत सोडविले.’’ 

राजनाथसिंह म्हणाले, ‘‘भारताची आत्मा शहरात नाही तर गावात वसली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी यात्रेसाठी राष्ट्रसंतांच्या गावाची निवड केली. शेतकऱ्यांच्या खिशात पैसा असेल तर बाजार व्यवस्था सुरळीत राहील. म्हणून भाजप सरकारने नेहमीच शेतकरी, शेतमजुरांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करूनच आम्ही थांबणार. शेतकऱ्यांसाठीच्या धोरणामुळे आत्महत्यांवरदेखील लवकरच नियंत्रण मिळेल.’’ 

३१ ऑगस्टपर्यंत ३१ जिल्ह्यांत साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करेल. दोन टप्प्यांत १५० मतदारसंघात पोचून तिथे मुख्यमंत्री सभा घेतील. विदर्भात ४४ मतदार संघात ८७ सभा, १२०० किलोमीटरचा प्रवास यात्रेचा होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT