Mahakesar Mango Growers Association
Mahakesar Mango Growers Association 
मुख्य बातम्या

महाकेसर आंबा बागायतदार संघाने कसली कंबर; उद्या वेबिनार

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यभरातील केसर आंबा उत्पादकांना दिशा देण्याच्या उद्देशाने नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या महाकेसर आंबा बागायतदार संघाने कंबर कसली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या यापुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. मोहर व्यवस्थापनावर मंगळवारी (ता. २९) वेबिनार व सोबतच बाग व्यवस्थापनासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयीही मार्गदर्शन केले जाणार आहे.

महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या पत्रकार परिषदेला अध्यक्ष सुशील बलदवा, तज्ज्ञ संचालक व उपाध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे, सचिव पंडित लोणारे, नंदलाल काळे, शिवाजीराव उगले, अशोक सूर्यवंशी, रसूल शेख व विकास कापसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून सचिव लोणारे यांनी महाकेसर आंबा बागायतदार संघाची स्थापना, त्यामागील उद्देश, वाटचाल याविषयी प्रकाश टाकला. त्यानंतर संघाचे तज्ज्ञ संचालक उपाध्यक्ष डॉ. कापसे यांनी केसर आंब्याचे महत्त्व, त्याची राज्यातील स्थिती, आंबा बागेचे व्यवस्थापन, त्यामधील उणिवा, सुधारणा करावयाची गरज, गतवर्षी तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेल्या बागायतदारांना झालेला फायदा आदींची सविस्तर माहिती दिली.

यंदा कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये आंबा अपेक्षेच्या तुलनेत आधी मोहरला. आंबा बागायतदार संघाच्या संपर्कातील दोन व्हॉट्‌सॲप ग्रुपवर राज्याच्या विविध भागांतील केसर आंबा उत्पादकांशी संवाद सुरू आहे. त्याचेही सकारात्मक पुढे येत आहेत. त्यामधून राज्याच्या विविध भागांत जवळपास ९० टक्‍के बागांना बऱ्यापैकी मोहर आल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येत्या एप्रिलमध्ये केसरची चव राज्याच्या विविध भागांतील ग्राहकांना चाखायला मिळेल अशी अपेक्षा असल्याचे डॉ. कापसे म्हणाले.

संघाचे महत्त्वाचे उद्देश

  • आंबा बागायतदार संघाच्या सबलीकरणावर असणार भर
  • केसर आंबा लागवडीसाठी शेतकऱ्यांना देणार प्रोत्साहन
  • काढणीनंतरची हाताळणी व प्रक्रियेविषयी करणार मार्गदर्शन
  • पाणी व्यवस्थापनाची शेतकऱ्यांना देणार तांत्रिक माहिती
  • परदेशात व देशांतर्गत ब्रॅंड निर्मितीसाठी प्रयत्न
  • विशिष्ट निविष्ठा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी करणार प्रयत्न
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    SCROLL FOR NEXT